श्रद्धांजली

श्रद्धांजली – चित्रा बेडेकर

ज्येष्ठ संशोधक, लेखिका आणि विज्ञान चळवळीतील कार्यकर्त्या चित्रा बेडेकर यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील ‘एआरडीई’मध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून शस्त्रास्त्रनिर्मिती प्रकल्पांवर त्यांनी काम केले. लोकविज्ञान चळवळीशी त्या जोडलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी वैज्ञानिक, सामाजिक व राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण केले. ‘अण्वस्त्रे, शस्त्रस्पर्धा आणि आंदोलन’, ‘स्फोटकांचे अंतरंग’, ‘एड्स’ ही त्यांची काही उेखनीय पुस्तके आहेत.

पालकनीती परिवारातर्फे चित्राताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.