१ डिसेंबर २०२४ – खेळघरचे गॅदरिंग संपन्न झाले.

रविवारी १ डिसेंबर २०२४ ला पालकनीती परिवाराच्या खेळघरचे गॅदरिंग संपन्न झाले. गॅदरिंग म्हणजे सगळ्यांच्या मनात उत्साह जगवणारी एक सुंदर गोष्ट असते. आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट ठरवून, मनापासून प्रयत्न पूर्वक पूर्णत्वाला नेणे आणि सर्वांसमोर सादर करणे ही प्रोसेस फार मनोहारी असते. मुलांनी उत्तम dance performances सादर केले. आपोआप आपले शरीर ताल धरेल अशी मस्त ठेका असलेली वेगवेगळ्या भाषांतली गाणी निवडली होती. त्यावर थिरकणारी मुले, मुली तो आनंद आमच्यापर्यंत पोचवत होती. गाणी, कविता, नाटके असे अनेक कार्यक्रम बसवले होते. इंग्लिश गाणी आणि गोष्टीच्या पुस्तकांवर आधारित नाटके हे या वर्षीचे वैशिष्ट्य होते. मुलानीच बनवलेल्या शॉर्ट फिल्म ( reels ) चा वापर देखील मस्त झाला. पालकांनी देखील त्यांची मनोगते व्यक्त केली, आणि एक धमाल डान्सही सादर केला. अशा कार्यक्रमांमधून मुले, शिक्षक, कार्यकर्ते एकमेकांच्या जवळ येतात. नात्याची गुंफण होते. हा आनंद दीर्घकाळ टिकणारा असतो.

Parental family playhouse gathering held on Sunday, December 1, 2024.
Gathering is a beautiful thing that brings enthusiasm in everyone’s mind.
Deciding something you love, trying to complete it with all your heart and present it in front of everyone is very beautiful. Kids performed great dance performances. Songs from different languages were selected with great contracts that will automatically hold the rhythm. Boys hanging on it, girls was bringing that joy to us. Many programs like songs, poems, dramas were arranged. Dramas based on English songs and story books were this year’s feature. The use of the short film (reels) made by the kids also became great. Parents also expressed their moods, and performed a rocking dance. Children, teachers, activists come close to each other through such programs. There was a relationship cave. This joy lasts long.

https://www.instagram.com/reel/DDE6b67zxmY/?igsh=dGtjejY0eXVlenlj