पैसा हे विनिमयाचे साधन, ते पैसा हे सर्वस्व – अशी विचारसरणी असलेली माणसे आपल्याला आजूबाजूला दिसतात. ते साध्य नाही हे समजत असूनही, तेच साध्य करण्यासाठी चाललेली माणसांची धावपळ आणि लगबग पाहता – हा विचार माणसाचा ठाव नेमका कधी घेतो – ही संशोधनाचीच बाब.
पैशाची अपरिहार्यता नाकारता येत नाहीच; पण पालकत्वाच्या अंगाने विचार करताना हा पैसा मुलांच्या आयुष्यात नेमका कधी आणि कसा डोकावतो, त्याचा त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम, मुलांना कळत नकळत मिळणारे संदेश, घरातल्या आर्थिक स्थितीबद्दल मुलांशी मनमोकळा संवाद, अर्थसाक्षरता, मुलांच्या मनात पैशांबद्दल निर्माण होणारी स्वामित्वाची भावना, या साऱ्यात समाजमाध्यमांचे योगदान… असे विविध विषय २०२५ च्या ऑक्टोबर – नोव्हेंबर जोडअंकातून पालकनीतीने हाताळले आहेत.
१. पैसे आणि बरंच काही – मुक्ता चैतन्य
२. अर्थपूर्ण भासे मज हा – डॉ. नंदू मुलमुले
३. मालकी (कविता) – प्रियदर्शन सहस्रबुद्धे
४. पैशाने असुरक्षितता वाढते – प्राजक्ता अतुल
५. नोकरी सोडताना – ऋषिकेश दाभोळकर
६. पैसा! पैसा!! आहे मनोहर तरी – डॉ. गीताली वि. मं.
७. किती म्हणजे पुरे – विक्रांत पाटील
८. निम्न आर्थिक वर्गातील अर्थकारण – अद्वैत दंडवते
९. “मुलांसोबत कपड्यांच्या घड्या घाला!”… बेकी केनेडी – रुबी रमा प्रवीण
१०. आणखी थोडं – सूनृता सहस्रबुद्धे
११. आमचा एकत्र वाढण्याचा प्रवास – गिरीश दरक, शिरीष दरक
१२. पैसा ये पैसा – परेश जयश्री मनोहर
१३. ‘नाण्या’च्या दोन बाजू – ज्योती दळवी
१४. आधी बीज पेरले… – वैभव त्र्यंबक तुपे
१५. छोट्यांच्या डायरीतून… – सोहम दादासाहेब माने
१६. पैसा है तो इज्जत है!!! – प्रणाली सिसोदिया
१७. ऑनलाईन शॉपिंगचे फ्याड! – प्रीती पुष्पा-प्रकाश
१८. गरजांची गंमत – गाथा वळसंगकर
१९. सजग संयत जीवन आणि अर्थाभान – डॉ. रामदास महाजन
२०. विनिमय, वस्तुकरण आणि बकालीकरण : काही सामाजिक संदर्भ – डॉ. संजय सावळे
२१. गरज, सोय, चैन – सुवर्णा सखदेव
२२. पैशाची गोष्ट – राजीव तांबे
२३. दाम करी काम? – शुभम शिरसाळे
२४. पैसा – पालकांचा – मुलांचा – अश्विनी मंदा मच्छिंद्र लबडे
२५. आनंद की ‘सोहळे’बाजी? – रश्मी रोहन
२६. मुलांचे वाढदिवस आणि पैशाचा पाऊस – प्रीती पुष्पा-प्रकाश
२७. अर्थाचा मथितार्थ – रमा सप्तर्षी
२८. पॉकेटमनी – दीपा पळशीकर
२९. छोट्यांच्या डायरीतून… – अथर्व खंडू औटे
Download this limited edition (first 21 pages only) in PDF format.
एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.
