मागे ‘नदी’ वर आम्ही एकत्र प्रकल्प केला होता. त्यांना नदीची गोष्ट सांगितली होती आणि मग विठ्ठलवाडी आणि घोरपडे घाटावर त्यांना घेऊन गेले होते. मोठ्या मुलांना मुठे गावात, नदी पुणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी कशी दिसते ते दाखवायला खास नेले होते.
Aditi devdhar
लक्ष्मीनगर, कोथरूड येथे खेळघरचे वर्ग आहेत. टेकडीवर भरपूर कचरा आहे, त्यात काय काय आहे इत्यादी माहिती मुलांकडून मिळाली. कचऱ्यात काय दिसते आणि काय दिसत नाही, ही दोन निरीक्षणे खूप काही सांगून जातात. त्यावर चर्चा केली. मुलांकडूनच उत्तरं मिळतात.
पेपर कपबद्दल बोलताना माझा collapsible steel ग्लास त्यांना दाखवला. ताई त्याच्या फटीतून पाणी सांडणार नाही का? मुलांची शंका. करून बघा म्हणल्यावर मग आळीपाळीने त्यात पाणी भरून पिऊन बघितले. ‘ताई, नाही सांडत’ म्हणून अभिप्राय आला.
वस्तीत हयाबद्दल काम करायचं आहे पण आमचं कोणी ऐकत नाही. तुम्ही लहान आहात, आम्हाला काय सांगता म्हणतात. मग त्यांना आम्ही Mission City Chakra मार्फत शाळेत काम करतोय त्याबद्दल सांगितलं. वस्तीत काम करायचं आहेच. त्या आधी हा प्रयोग शाळेत करून बघा. वस्तीत अनेक लोकांना सांगावं लागेल, शाळेत मुख्याध्यापकांना convince केलं की झालं, एकच व्यक्ति!!
ही कल्पना मुलांना पटली. एकूण चार वेगवेगळ्या शाळांतील मुलं होती. आपापल्या शाळेत मुख्याध्यापकांशी मुले बोलणार आहेत, त्यांना मदत लागेल ती मी करणार असं ठरलं. एका मुलाने मुख्याध्यापकाचा रोल केला. इतरांनी त्याला पिच केलं. कसं बोलायचं हे ठरवलं.
मग आम्ही ‘One Little Bag’ हे पुस्तक वाचलं. एकही संवाद नसलेलं, केवळ चित्रातून गोष्ट सांगणारं पुस्तक मुलांना आवडलं.
शुभदा, माझी hairstyle तुझ्यासारखी आहे. तू आणि शुभदा ताई बहिणी आहात का असं मला विचारलं

