आमचा अनिकेत इंजिनिअर झाला
त्याची गोष्ट – चौथीत असताना अनिकेतचे कुटुंब पुण्यात आले. तिघे भाऊ, आई – वडील. वडील दारू मध्ये बुडालेले. आई काम करून संसार करत होती.कौटुंबिक हिंसाचारही होता घरात. मुले जशी मोठी झाली तशी बापाचा हात धरायला लागली. मुलांचे अभ्यासात फारसे लक्ष नवते. पण खेळघरात मात्र regular होते.अनिकेत दहावी जेमतेमच पास झाला. ही मुले दहावी झाली त्या काळात खेळघराचा युवक गट जरा मोडकळीला आला होता. सक्षम ताई मिळत नव्हती. मग मीच युवकगटाची जबाबदारी घेतली. अनिकेतने खेळघराच्या मदतीने अभिनव अभियांत्रिकी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतला. पण त्याचे इंग्लिश चांगले नसल्याने पहिल्या वर्षी पास होऊ शकला नाही . पुढच्या वर्षी त्याच्याबरोबरच्या ५-६ मुलांनी आपटे प्रशालेमध्ये electrical vocational घेऊन ११वी साठी प्रवेश घेतला. अनिकेतला ११वी१२ वीत electrical या विषयात चांगला रस निर्माण झाला. इंग्लिश स्पीकिंगचाही कोर्स त्याने उत्साहाने पूर्ण केला. अनिकेत दिसायला राजबिंडा होता…शिवाय आता अभ्यासात पण पुढे आला. त्याला चांगला आत्मविश्वास प्राप्त झाला. १२ वी नंतर त्याने electrical मध्ये डिप्लोमाला प्रवेश घेतला. जातीचा दाखला असल्याने त्याला फी चा खर्च कमी होता. आणि खेळघराची सर्वतोपरी मदत होतीच. डिप्लोमा चांगल्या रीतीने पास झाल्यावर त्याने डिग्रीला झील कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. मात्र आता नोकरी करून कमावण्याची देखील कुटुंबाची गरज वाटत होती. मधल्या काळात वडिलांचे निधन झाले. तिन्ही भावंडे कमावत असल्याने आर्थिक प्रश्न आले नाहीत. एवढेच नव्हे तर तिघांनी मिळून वस्तीत काँक्रिट स्लॅब चे घर देखील बांधले.एकीकडे पुणे मेट्रोमध्ये नोकरी करत त्याने engineering पूर्ण केले. परीक्षेच्या आधी महिना महिना खेळघरात येऊन तो अभ्यास करत असे.कालच त्याचा रिझल्ट हातात आला.” काकू झालो मी engineer ” असे सांगणारा त्याचा फोनवरील आवाज आनंदाने ओसंडून जात होता.आता तो एमएससीबीच्या परीक्षांची तयारी करणार आहे. एकीकडे भाऊ अक्षय बरोबर electrical contracts सुध्धा घेत आहे. बरीच स्वप्ने आहेत…आणि ती पूर्ण करण्याचा आत्मविश्वास देखील आहे. अनिकेतला शुभेच्छा!