कोथरूडच्या लक्ष्मीनगर या झोपरवस्तीत पालकनीती परिवारच्या खेळघर प्रकल्पाचे काम गेली ३० वर्षे चालू आहे.
दहावी पास झाल्यावर मुलांनी पुढे चांगले शिकावे … सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे रहावे, स्वतःसह कुटुंबाला देखील गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढावे यासाठी २००७ पासून दरवर्षी मुलांना खेळघराकडून आर्थिक मदत दिली जाते.
या वर्षी या कामात गोखले सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सुहास गोखले यांनी मदत केली. ७ मुलांना त्यांनी मुलांच्या गरजेनुसार स्कॉलरशिप दिली.
आज ही मुले, त्यांचे पालक आणि सुहास सर, आमचे मित्र – सुहृद शेखर थिटे सर आणि आमच्या सिनियर कार्यकर्त्या सुमित्राताई मराठे असे सर्व जमलो होतो. मुलांशी छान संवाद झाला… देवाण घेवाण झाली.
मुलांना प्रेरणा मिळाली आणि आम्हाला मुलांच्या परिस्थितीबद्दल आणखी काही समजले… मुलांनी सुहास सरांना स्वतः बनवलेली thank you cards दिली.
एक छोटासा हृद्य सोहोळा साजरा झाला.
