ग्रीक शिक्षणाचा विस्तार …

अरविंद वैद्य

आपल्या देशाच्या इतिहासातील काही नावे सगळ्यांच्या परिचयाची असतात. अलेक्झांडर-द-ग्रेट हे असेच एक नाव. अलेक्झांडर हाही ग्रीकच पण ग्रीसचा नव्हे. ग्रीसच्या शेजारीच मॅकडोनिआचा राजा फिलीप याचा हा मुलगा. मॅकडोनिआच्या फिलीपने इ. पूर्व 338 मध्ये ग्रीस जिंकलं. इ. पूर्व 5 व्या 4 थ्या शतकात जग अगदी लहान होते. भूमध्य समुद्राच्या बाजूचा प्रदेश आणि आशियातील चीन व भारत वर्ष एवढाच जगाचा, ज्ञात जगाचा विस्तार होता. फिलीपने ग्रीस जिंकण्यापूर्वीच नगर राज्यांच्या आपापसातील लढायांमध्ये ग्रीस दुर्बल झाला होता. इ. पूर्व 404 मध्ये अथेन्स पडले आणि ग्रीसमधील सत्तेचा समतोल गेला. त्या मानाने ग्रीकवंशाच्याच राजांच्या अधिसत्तेखाली असलेले मॅकडोनिआचे राज्य समर्थ होते. फिलीपने इ. पूर्व 338  मध्ये ग्रीस जिंकल्यावर राजपुत्र अलेक्झांडर त्यावेळचे जग जिंकायला निघाला. त्याने काही काळातच भूमध्य समुद्रा- भेावतालची राज्ये आपल्या साम‘ाज्याला जोडली आणि तो इ. पूर्व 325 च्या सुमारास भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यन्त येऊन पोहचला. थकलेल्या सैन्याने घरी जाण्यासाठी बंडाळी केली त्यामुळे सीमेवरून अलेक्झांडरला परतावे लागले हा त्याचा इतिहास आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे. सिकंदरसारखे चित्रपट, सीमेवरून परत जा सारखी नाटके आणि चाणक्य सार‘या टी.व्ही. सिरिअल्सनी या इतिहासाची आपली उजळणी अनेकदा केली आहे. अलेक्झांडरला आपण जगज्जेता म्हणून ओळखतो!

फिलीपने ग्रीस जिंकला असला आणि त्याचा मुलगा जगज्जेता झाला असला तरी शिक्षणाच्या बाबतीत मात्र जिंकला गेलेला ग्रीस हा जेता ठरला. अलेक्झांडरने ग्रीसची शिक्षण व्यवस्था नष्ट केली नाही तर त्याने आपल्या संपूर्ण साम‘ाज्यात तिचा विस्तार केला.

तसे पाहिले तर अलेक्झांडर हा शिक्षणाच्या दृष्टीने ग्रीसचा विद्यार्थी होता. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य जो अ‍ॅरिस्टॉटल त्याचा अलेक्झांडर हा शिष्य. इ. पूर्व 347 मध्ये प्लेटोचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वर्षे अ‍ॅरिस्टॉटल ग्रीसच्या बाहेर होता. त्यातील तीन वर्षे तो अलेक्झांडरचा गुरु होता. अलेक्झांडरने आपल्या संपूर्ण साम‘ाज्यात ग्रीकशिक्षणपद्धतीचा प्रचार केला. नाईल नदीच्या खोऱ्यात, इजिप्तमध्ये वसविलेल्या अलेक्झांड्रिया या शहरात, त्याने एका विश्वविद्यालयाची स्थापना केली होती.

अ‍ॅरिस्टॉटलला आपण जसा एक तत्ववेत्ता म्हणून ओळखतो तसा तो शिक्षणात लायब‘रीचे महत्त्व जाणणारा पहिला शिक्षक होता. त्याच्या जवळ मोठा ग्रंथ संभार होता. त्याने अथेन्समध्ये विश्वविद्यालयाचा प्रारंभ केला असे म्हणता येईल. अर्थात त्याचे मूळ त्याचा गुरु प्लेटो याने आपल्या बागेत आणि जिममध्ये सुरू केलेल्या अकॅडमीमध्ये होते.

इ. पूर्व 323 मध्ये अलेक्झांडरचा अवेळी अंत झाला आणि त्याचे साम‘ाज्य लहान लहान तुकड्यांमध्ये विभागले गेले तरी त्याने सुरू केलेले ग्रीकपद्धतीच्या शिक्षणाचे कार्य खंडित झाले नाही. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इ. पूर्व 323 पासून इजिप्तवर टॉलेमी घराणे राज्य करू लागले. त्यांनी अलेक्झांड्रिया येथे मोठी लायब‘री उभी केली. या लायब‘रीमध्ये असलेल्या हस्तलिखित ग्रंथांची सं‘या इ. पूर्व 1 ल्या शतकापर्यन्त 7 लाखाच्यावर गेली होती.

ग्रीसचे वैभव सरले. ग्रीस मॅकडोनिआने जिंकले, अलेक्झांडरच्या मृत्यू नंतर मॅकडोनिअन साम‘ाज्याचे तुकडे झाले. त्यातून स्वतंत्र झालेली राज्ये पुढे इ. पूर्व 30 मध्ये रोमन साम‘ाज्याचा भाग बनली तरी ग्रीकशिक्षण व्यवस्था आणि त्यातून व्यक्त होणारी ग्रीकसंस्कृती मात्र नष्ट झाली नाही तर उलट ती सर्व भू मध्य सामुद्रिक जगताची सामाईक संस्कृती बनली. एवढेच नव्हे तर याच काळात जन्माला आलेली युक्लिड याची भूमिती, आर्किमेडीज याची भौतिकी, हीरो आणि फिलो यांचे डायनॅमिक्स हे आज मितीस संपूर्ण मानव जातीचे विचारांचे धन आहे.

का पाडू शकली ग्रीकशिक्षण व्यवस्था हा प्रभाव? का ठरली ग्रीकसंस्कृती अजिंक्य? त्याचे श्रेय ग्रीकतत्वज्ञान म्हणून जे पुढे आले त्या विचाराला आहे. सॉक्रेटिस याला आपण पाश्चिमात्य तत्वज्ञानामधील मूळ पुरुष मानतो. प्लेटो ह्या त्याच्या शिष्याने त्याचे तत्वज्ञान पुढे विकसित केले. सॉक्रेटिस याने  तर्ळीीींश ळी ज्ञििुश्रशवसश, सद्गुण म्हणजेच ज्ञान असे सांगितले आणि हे सद्गुण शिकवता येणे शक्य आहे आणि तर्काच्या सहाय्याने हे शक्य आहे असे प्रतिपादले. आता तर्काला एवढे महत्त्व दिल्यावर तर्क ही कोणाही माणसाची नैसर्गिक क्षमता असल्याने शिक्षण हे कोणत्याही वर्गाची मिरासदारी ठरू शकत नाही हे ओघाने आले. सॉक्रेटिस आणि प्लेटो तत्वज्ञानाच्या मांडणीत हे मान्य करत होते परंतु प्रत्यक्षात त्यांच्या काळात शिक्षण ही फक्त उच्च- वर्गीयांचीच मिरासदारी होती. ही विसंगती होती. ग्रीसच्या पाडावाबरोबर तेथील उच्चवर्गीयांची सत्ता संपत्ती आणि ह्या विसंगतीचा आधार गेला. विसंगती संपली आणि शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले.

इ. पूर्व 4 थ्या शतकापासूनचा काळ हा भूमध्य सामुद्रिक प्रदेशात खूप घडामोडीचा कालखंड होता. लढायांमध्ये सामील होणारे सैन्य, सैन्याच्या मागून जाणारे कारागीर आणि व्यापारी, दर्यावर्दी हे समाजाच्या फक्त वरच्या वर्गातून येऊच शकत नव्हते आणि त्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले होणे अपरिहार्य होते. समाजाची ती गरज होती. ही गरज ओळखून ग्रीकतत्वज्ञानाने वर उ‘ेखिलेला विरोध संपविला आणि शिक्षण कॉस्मोपॉलिटन बनले.

मागील लेखात ग्रीकशिक्षणाचे वर्णन करताना स्पार्टाच्या लष्करी शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या शिक्षणाचे वर्णन केले आहे. ते शिक्षण फक्त समाजाच्या एका वर्गालाच उपलब्ध होते पण आता शिक्षण सर्वासाठी खुले झाले. अथेन्सच्या शिक्षणामध्ये वादपटुत्व, तर्क, कला, संगीत याना कसे अधिक स्थान होते याचे वर्णन आहे. त्याचा उत्कर्ष होत अथेन्स आणि अलेक्झांड्रिया या ठिकाणी विश्वविद्यालये सुरू झाली. ग्रीकशिक्षणाच्या विस्ताराच्या ह्या काळात विश्वविद्यालये-वाचनालये यांची निर्मिती आणि कॉस्मोपॉलिटन शिक्षण ही दोन ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.

कॉस्मोपॉलिटन ह्या शब्दाचा अर्थ शब्द कोषात कर्रींळसि शििश्रिश िी ळवशरी षीिा ारिू रिीीीं षि ींहश ुिीश्रव, असा दिला आहे. एखादी गोष्ट कॉस्मोपॉलिटन असायला हवी असेल तर त्या गोष्टीला अपरिहार्यपणे उदार, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असावे लागते. ग्रीकशिक्षण व्यवस्था विजेत्या सम‘ाटाबरोबर निरनिराळ्या भागात गेली, इजिप्तमध्ये गेली, कार्थेजमध्ये गेली, बॉबिलॉनमध्ये गेली, इस्राएलमध्ये गेली, पण ती विजेती म्हणून गेली नाही. ग्रीसला जशी त्याची परंपरा होती तशी या प्रत्येक भागाला होती. ग्रीसजवळ जसे देण्यासारखे खूप होते तसे या प्रत्येक भागाजवळही होते. ते सारे मोकळेपणाने दिले घेतले गेले आणि त्या त्या भागातील त्यांची त्यांची वैशिष्ट्ये कायम ठेऊन ग्रीसच्या शिक्षणव्यवस्थेशी संकर होऊन नवी शिक्षण व्यवस्था जन्माला आली. इस्राएलमध्ये तयार झालेली जुईश शिक्षणपद्धती हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. एक उदाहरण म्हणून त्याचा थोडा मागोवा घेऊ या.

ज्यू लोक हे मूळचे इजिप्तमधील वेठबिगारी करणारे लोक. मोझेसच्या नेतृत्वाखाली ते तेथून पळाले आणि इस्राएल भागात स्थाईक झाले.जेहोव्हा हा त्यांचा रक्षण करणारा देव. तो रक्षणाबरोबरच नीतीनियम घालून देण्याचेही काम करी. हे काम प्रेषितांच्या माध्यमातून चाले. मोझेस हा पहिला प्रेषित. त्यांचा राजा डेव्हीड याने त्यांचे राज्यशास्त्राचे नियम ठरविले. ज्यू हे मूळचे शेतकरी. सोलोमान राजाने त्यांना व्यापारात आणले. इ. पूर्व 444 मध्ये इझ‘ाने मोझेसच्या आज्ञा पुस्तक रूपात आणल्या जुईश धर्म हा ग्रंथ प्रामाण्य मानणारा धर्म बनला. अलेक्झांडरच्या काळात ज्यू हे पर्शियन साम‘ाज्याचे प्रजाजन होते. अलेक्झांडरने पर्शियाना जिंकल्यानंतर ते त्याचे प्रजाजन बनले. त्या वेळी हा समाज तसा मागासच होता. मोझेसच्या आज्ञा सांगणारा ग्रंथ, व्यापारासाठी आवश्यक तो हिशोब आणि नीतीनियम एवढ्यापुरतेच शिक्षण मर्यादित होते. अलेक्झांडरने जिंकल्यामुळे ज्यूंना आपल्या श्रद्धा बदलाव्या लागल्या नाहीत पण ग्रीकांच्या सानिध्यामुळे ज्यू आता शिक्षण अधिक गंभीरपणे घेऊ लागले. त्यांच्या शिक्षणात कायद्याच्या पुस्तकाना अधिक महत्व आले. आता जी पुस्तके अभ्यासासाठी तयार झाली त्यांचा केद्रबिन्दू ज्यू धर्म नव्हता तर संपूर्ण मानवता हा होता. माणसाच्या अंगच्या गुणांचा विकास हे शिक्षणाचे ध्येय ठरले. प्राथमिक-माध्यमिक आणि उच्च पातळीवरील शिक्षण अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरील शिक्षणाची पद्धती ज्यूं नी आत्मसात केली.

ज्यूं प्रमाणेच ग्रीकांच्या संपर्कात आलेले दुसरे लोक म्हणजे रोमन्स! ज्यू हे ग्रीकांचे जित होते तर रोमन्स हे जेते होते. रोमन लोकांवर ग्रीकशिक्षणाचा काय परिणाम झाला याचा विचार आपण पुढील लेखात करूया!