चमारीच्या बकरीला कोकरू
माझ्या वर्गातील लक्ष्मी नावाची मुलगी आहे. काल वर्गामध्ये चमारीचे कोकरू हे पुस्तक वाचले . चमारीच्या बकरीला कोकरू होते आणि ती त्याच्याशी खेळते.
वाचत असताना लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघत होते. तिच्या घरात बकऱ्या आहेत “ती म्हणाली ताई ” आमच्या घरीपण बकरीला कोकरू झालं आहे तुम्ही बघायला या. मीपण त्याची काळजी घेते. त्यांच्याशी खेळते.
आज पुन्हा गोष्ट वाचूया म्हटल्यावर लक्ष्मीने चमारीचे कोकरू हे पुस्तक आणून दिले. आम्ही गोष्ट वाचण्यात रमून गेलो.
लक्ष्मी म्हणाली, ताई आज नक्की यायचं कोकरू बघायला. मी तिच्या घरी गेले एक कोकरू सहा दिवसांचे होते आणि दुसरी दोन कोकरू चार दिवसांची होती.
मी पहिल्यांदाच बकरीची पिल्लं समोर बघितली आणि त्यांना हात लावून जवळ घेतल. ही सगळी शिक्षण्याची प्रोसेस बघून मला खूप छान वाटते.
सारिका जोरी