दशकाचा सराव

दशकाचा सराव

सलग तीन दिवस दशकाचा सराव चालू होता.बिया,आईस्क्रिमकाड्या आणि दांडे सुट्टे याचा सराव घेतला.

10 रुपयाची नोट ही मुलांना कुतूहल म्हणून दाखवली आणि दशक म्हणजे दहा हे त्याचे पक्के लक्षात राहिले.त्यांना किती नोटा म्हणजे किती दशक आणि किती रुपये याचा सराव झाला. त्यानंतर प्रत्येकाला दहा रुपये देऊन दोन वस्तू घेऊन या असे सांगितलं.

8 मुलं शेंगदाणे घेऊन आली, काहींनी मुगाची डाळ, वाटाणा, पॉपकॉर्न, पेढा, सोनपापडी आणि नमकीन असे पदार्थ सगळे मिळून घेऊन आले.

मला मुलांचे कौतुक वाटले की वर्षाच्या सुरवातीला त्यांच्या बरोबर पौष्टिक खाऊ बद्दल वर्ग झाला होता मुलांच्या आजही त्या गोष्टी लक्षात होत्या आणि ते मुलांनी त्यांच्या कृतीतून लक्षात आले.

शेंगदाणे कच्चे खाल्ले तर काय होईल म्हटल्यावर मुलांकडून आलं की ताई पोट दुखेल आपण शेंगदाणे भाजून खाऊया. आम्ही शेंगदाणे भाजले. मुलांचा खाऊ तिखट आणि गोड असे दोन भाग करून आम्ही सगळ्यांनी खाऊ फस्त केला.

प्राथमिक गट 1 – सारिका जोरी