पौष्टिक खाऊ

 aaa

खेळघरातला इयत्ता पहिलीचा वर्ग! मुलांचा आवडीचा विषय खाऊ! वर्ग घेताना मुलांना रोज एक प्रश्न विचारते.

एकदा त्यांना विचारले, ” तुम्हाला खाऊला किती पैसे मिळतात आणि तुम्ही त्याचा काय खाऊ आणता? 

बांबू, वेफर्स,दोडका, गुलाबजाम, कुरकुरे, पेप्सी आणि मॅगी अशी उत्तरे मिळाली. सगळ्यांना 5 ते 10 रुपये खाऊ खायला मिळतात.

पाच ते दहा रुपयात काय काय पौष्ठीक खाऊ येऊ शकतो हे मुलांना कळण्यासाठी मी काही वस्तू खरेदी करून आणल्या.

दही, फुटाणे, वाटणे, भाजकी डाळ, गाजर, बीट, काकडी, केळी, शेंगा, ओला वाटाणा, मका, चिक्की, खजूर -शेंगदाणा -राजागिरा लाडू, गूळ, खोबरे, शेंगदाणे, भेळ आणि अंडी असे पदार्थ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ठेऊन, त्यावर त्यांची नावे घातली. आपल्या शरीराची चांगली वाढ करणारा, आपल्याला ताकद देणारा पौष्टिक खाऊ कोणता, याची ओळख करून दिली.

नंतर सगळ्यानी मिळून खाऊचा चट्टा मत्ता केला.

सारिका जोरी