बाळ वाढताना…’
पालकनीतीला 15 वर्षे पूर्ण होत आहेत. पालकत्व आपल्या आयुष्यात आनंदाबरोबरच नवनवी आव्हानं घेऊन येतं. ते समर्थपणे पेलता यावं यासाठी पालकनीतीची नेहमीच एक मित्र – साथीदाराची भूमिका असते. नववर्षाच्या निमित्तानं एक छोटीशी भेट आपल्या सर्वांकडे धाडत आहोत. पहिल्या 3 वर्षांतले बाळाच्या वाढीचे टप्पे सांगणारी ही एक छोटीशी पुस्तिका.
ज्यांच्या घरात नव्यानं बाळ जन्माला आलं आहे, विशेषत: ते पहिलं अपत्य आहे अशा आपल्या मित्रमैत्रिणींना हे पुस्तक खूपच उपयोगाचं ठरेल. आपण या पुस्तकाची प्रत जरूर त्यांच्यापर्यंत पोचवावीत. नवीन वाचकांपर्यंत ‘पालकनीती’ पोचवण्याचं हे काम आपण प्रेमानं कराल हा विश्वास आहे. पुस्तक तयार करण्यापूर्वी या पानांच्या झेरॉयस प्रती काढून ठेवल्यात तर आणखी काही जणांना पुस्तक देता येईल.
पान क्रमांक 7 ते 14 अशी मधली पाने सोडवून व कापून घ्या. ती ओळीने एकत्रच ठेवा. मधल्या आडव्या तुटक रेघेवर दुमडून वरचा भाग खाली टेकवा (दरीची घडी). तुटक रेघेवर कापा. नंतर मधल्या उभ्या रेघेवर दुमडून डावीकडचा भाग उजव्या भागावर घ्या (दरीची घडी). मधे शिवून/टाचून घ्या. आता पुस्तक तयार होईल.