माझे व्रत, माझे कर्तव्य : एक पालक म्हणून – कविता निरगुडकर

लग्नानंतर स्वत:चा संसार सुरू झाला तेव्हा ध्यानात आलं की आईनं आपल्यावर नकळत अगणित चांगले संस्कार केलेत! मुलांच्या जन्मानंतर तर हे अधिकच जाणवलं. प्रत्यक्ष सणवार, व‘तवैकल्य यांचं अवडंबर मी कधीच माजवलं नाही. मुलांनाही आपल्यासारखं सुसंस्कृत करण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहिलो. वेगळीच व‘तं आम्ही पाळली, जपली.

पहिलं म्हणजे पति-पत्नींनी मुलांसमोर मतभेद-कलह होऊ द्यायचा नाही. मुलांशी बोलताना आई-बाबा यांच्यामधे एकवाक्यता पाळायची. त्यामुळे त्यांना आई-बाबा दोघांविषयी प्रेम आणि आदर वाटतो; त्यांच्याविषयी एक खात्री पटते.

सुजाण पालकत्वाचं हे व‘त पाळताना पुष्कळदा आपल्या आंधळ्या मायेनं कर्तव्याचा विसर पडून मूल बिघडतं. तेव्हा गरजेनुसार थोडं कठोर व्हावंच लागतं. …..माझा मुलगा 5 वी – 6 वी मध्ये असेल. एक दिवस चित्रकलेचे सगळे कागद घरीच घेऊन आला, ‘‘आई मला मदत करतेस?’’ मी म्हटलं, ‘‘हे रे काय? शाळेतलं काम घरी कसं आणलंस?’’ ‘‘सगळेच घरी नेतात. वर्गात होत नाही पूर्ण!’’ तो म्हणाला. दोन दिवसात आठ चित्रं पुरी करायची होती. मी जरा विचार करून त्याची सर्व चित्रं मोठ्या टेबलावर मांडली. रंगाची बशी त्याच्याजवळ ठेवून, एकेक रंग काढून दिला. प्रत्येक चित्रात, एकेका रंगाचं काम त्याला पुरं करायला लावलं. तासाभरात त्याची सारी चित्रं पूर्ण झाली. तो खेळायलाही पळाला. गोडीगुलाबीनं, त्याच्याच हातून काम पुरं करून घेतल्यानं तो खूश होता. आईचा आधारही झाला, मदतही झाली; शिवाय युक्तीही कळली नवीन! 

अभ्यासाबाबतही, आम्ही पति-पत्नी दोेघेही अगदी विरुद्ध आहोत. त्यापेक्षा मुळात जाऊन, खरं ज्ञान मिळवणं कसं फायद्याचं असतं, हेच आम्ही मुलाला पटवून देत होतो. तो शद्बार्थ विचारायचा, आम्ही त्याला ‘शद्बकोशात पहा’ असं सांगायचो. पण तो धुसफुसायचा, म्हणायचा ‘‘सगळ्यांचे पालक पटापटा कसं सांगतात.’’ मग मीच उठून, कपाटातून शद्बकोश आणून त्याच्यापुढं ठेवायची व त्याच्याचबरोेबर शद्बार्थ शोधायची. हळूहळू त्याच्या कलानं मी घेतलं, तेव्हा त्यालाही हे स्वत:च करणं फायद्याचं असतं, हे फार पटलं. मोठा होत गेला, तसा तो संदर्भासाठी विविध ग‘ंथ, अगदी विश्वकोशही हाताळू लागला. शाळेच्या ग‘ंथालयात बसून टिपणं काढू लागला. आपल्या मुलांना अभ्यासाची गोडी लागली की त्यासारखा आनंद नसतो दुसरा!

वाचनाचं वेडही या बालवयातच लागायला हवं. दहा-बारा वर्षांपूर्वीेचा किस्सा आहे हा. दिवाळी जवळ आली होती. मुलीला फटाके हवे होते. आणले थोडे. पण मनात विचार आला, अरे हा क्षणाचा आनंद … त्यापेक्षा फटाके कमी करून पुस्तकं  आणली तर? नंतरच्या वर्षी दिवाळीच्या आधी, मुलांना घेऊन पुस्तक-प्रदर्शन पाहायला गेलो. मुलं वेडावूनच गेली ती असं‘य कोरी पुस्तकं हाताळताना! ‘हे घेऊ? की ते घेऊ?’ असं त्यांना झालं. मी हळूच त्यांना म्हटलं, ‘‘यंदा फटाके कमी घेऊ, मग खूप पुस्तकं घेता येतील. फटाका काय उडवला की क्षणात खतम्. पुस्तकं कायम तुला वाचायला जवळ राहतील.’’ मुलाला ते फारच पटलं, म्हणाला, ‘‘फटाके नकोच. पुस्तकंच घे.’’ मग लेक लहान होती म्हणून तिच्या समजुतीपुरते थोडे फटाके नि मुलाला पुस्तकंं घेऊन घरी आलो.

पुढे 3-4 वर्षातच, दोघांनी मिळून ‘छोट्यांची छान लायब‘री’ तयार केली. पुस्तकं अगदी टापटिपीनं, नीटनेटकी, विषयवार लावली; आमच्या दोघांच्या ग‘ंथालयासारखी.

मुलांचा सर्वांगीण  विकास व्हावा म्हणून पालक नित्य झटत असतात. केवळ अभ्यासाचंच वेड नसावं मुलांना. त्यासाठी नृत्याच्या, गाण्याच्या, वाद्यवादनाच्या कार्यक‘मांना आम्हीच मुलांना आवर्जून घेऊन जायचो. चित्र-शिल्पं यांचीही प्रदर्शनं त्यांना मी दाखवत होते. स्वत:ची कामं थोडी बाजूला ठेवून या विविध गोष्टी मुलांच्या बालपणीच केल्या आम्ही. त्यांचा कल ध्यानी आला. पुढं मुलगा तबला शिकला, मुलीनं गाण्याच्या परीक्षा दिल्या. कलेची गोडी  वाढतीच राहिली.

मुलांनी व्यायाम करावा, निरोगी, सुदृढ व्हावं असं सर्वांनाच वाटतं. आमच्या मुलांना घरातच आम्ही योगासनं व विविध व्यायाम प्रकार शिकवले; स्वत: करूनच दाखवले. पण ज्यांना घरी हे शक्य नसेल त्यांनी व्यायामशाळेत मुलांना शिस्तबद्ध शिक्षण द्यायला हवे. मैदानी खेळांचीही मुलांना आवश्यकता असते. माझा लेक फुटबॉल, व्हॉलिबॉल खेळायचा; मुलगीही व्हॉलिबॉल खेळायला जायची. आम्ही दोघे सवड काढून त्यांच्या मॅचेस् बघायला आवर्जून जायचो. कौतुकही करायचो. कधी कधी आम्हीच त्यांच्या बरोबर कि‘केट, बॅडमिंटन, टेबल-टेनिस खेळायचो. मजा येत असे अगदी. मुलांना पालक मित्रांसारखे जवळचे वाटले तर उत्तमच!

व्यायामाप्रमाणे त्यांच्या आहाराकडेही मी खूप लक्ष देते. त्यांना वाढीच्या वयात सर्व जीवनसत्त्वं-प्रथिनं मिळालीच पाहिजेत, हा कटाक्ष असतो माझा. बालपणापासूनच नावडत्या पण पौष्टिक भाज्याही मी त्यांना आवडीच्या करून खाऊ घातल्या. उभयपक्षी फायदाच झाला. शिवाय त्यांच्या आवडीचे खमंग पदार्थ अधूनमधून आवर्जून करतेच. जबरदस्ती किंवा अतिआग‘ह धरण्यापेक्षा काही वेळा गप्प राहूनच मुलांना आपलं म्हणणं पटतं.

आजारपणात मुलांना पुष्कळदा निराधार वाटतं. तेव्हा आपल्या कामातून वेळ काढून त्यांच्या अवती-भोवती राहून, त्यांचं एकलेपण घालवून, त्यांना मानसिक आधार द्यायला हवा.  माझी मुलगी दीड-दोन वर्षांची होती. रक्तीआव झाली तिला; तर वर्षभर कडक पथ्यावर होती ती. घरातली इतर मंडळी सर्व पदार्थ खात असत. ते तिला चालत असे. पण मी मात्र तिचंच जेवण घ्यावं, हा तिचा आग‘ह असे. आता एवढ्याशा जिवाला काय समजावू? तिच्या समजुतीखातर, मी तेव्हा तिच्यासोबत बसून पथ्याचंच जेवले. सगळ्यांनी मला वेड्यात काढलं. पण लेकरू समाधानात होतं अन् मीही!

नाटक-सिनेमा, टि.व्ही. इत्यादी गोष्टींची मुलांना गरज असते. करमणूक हवीच. ठराविक मर्यादा घालून, मुलांना मी हे सारं पाहू देते. टि.व्ही. फक्त सुटीपुरताच ठेवते. काही चांगल्या मालिका वन्यप्राण्यांवरच्या षळश्राी, विज्ञानविषयक कार्यक‘म, शास्त्रीय संगीत…. असे काही कार्यक‘म मुलं टी.व्ही. वर पाहतात. उत्तम कार्टून्स मीही पाहते. त्यांच्याबरोबर सिनेमालासुद्धा कधीतरी जातो. आम्ही मुलांबरोबर काय चांगलं काय नाही, अशा चर्चाही करतो. मी घरात सुटीपुरताच टी.व्ही. ठेेवते याबद्दल शाळेतल्या शिक्षकांनी साश्चर्य अभिनंदन केलं माझं!

एक मात्र नक्की; मुलांना त्यांची म्हणून काही गुपितं वा खाजगी बाबी असतात. त्या तशा जरुर असू द्याव्या. पालकांनी दुुरून घारीसारखं लक्ष ठेवावं पण त्यांच्या मनाला दुखवून कुठलंही गुपित फोडू नये. उपदेश तर मुळीच आवडत नाही मुलांना. आपण सदाचरणी असणं इथं महत्त्वाचं आहे. आळस झटकून आपणच सदैव कार्यरत राहिलो तर मुलं कशाला आळसात लोळतील? आता मी गाण्याच्या रियाजाला बसले की मुलीला साथीला यावंसं वाटतंच; निदान पेटी-तानपुरा तरी ती हातात घेते. मुलगाही पट्कन तबल्यावर बसतो.

मुलां-मुलींना कसं हसावं-बोलावं, वागावं हे सांगायची काय गरज? आपणच आदबशीर, मृदू असलो की तेही लाघवी, गोड होतात. मुला-मुलींना उपजतच, स्वयंपाकघरात लुडबुड करावीशी वाटते. त्यांना स्वातंत्र्य द्यावं. धडपडत, प्रयत्नांती त्याही नीट सारं करतात. माझा लेकही नवीन ‘पदार्थ’ करून पाहतो. आई-बाबांना हौसेने करून, एखादा पदार्थ खाऊ घालावा असं मुलांनाही वाटतंच की! पदार्थ जमला की कित्ती आनंद होतो मग. मात्र आपण त्यांच्या मधेमधे लुडबूड करायची नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन अपत्यात भेदभाव करण्याचं अगदी टाळावं. तुलना तर मुळीच करू नये. त्याचा फार विपरीत परिणाम मुलांच्या मनावर होतो. मुलांना न दुखवता, चुका दाखवून द्याव्या. पालकांचा धाक असला तरी तितकंच प्रेम-आदर अन मैत्रीची जवळीकही वाटायला हवी! तरच मुलांना कधी निराधार वाटत नाही. सर्व संकटात पालकच त्राता अशी त्यांना खात्री असते. पण चोरी-खोटं बोलणं यासार‘या वावग्या गोष्टीमध्ये कडकपणे समज द्यावी.

पालकांना मुलांच्या अंगचे गुण वाढावेत म्हणून प्रसंगी स्वत:च्या वेळाचा, संधीचाही त्याग करावा लागतो, पण परिणामी मुलं यशस्वी होतात. पालकत्व कधी परमानंद देतं, तर कधी थोडा त्रास, कष्ट, त्यागही वाट्याला येतो. मला हे एक व‘तच वाटतं.

असं व्रतस्थ पालक होणं फार अवघड आहे. हे व्रत म्हणजे हे कर्तव्यकर्म, म्हणजेच सद्धर्म म्हणजेच ईश्वरपूजन. मुलं पंधरा-सोळा वर्षांची होईतो त्यांना पालकांच्या या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:चं कर्तव्य स्वत: जबाबदारीनं पार पाडावं, जर आपलं पहिलं व्रत आपण न उतता, मातता, घेतला वसा न टाकता पूर्ण केलं असेल, तर मुलामुलींनाही स्वत:च्या कामाकर्तव्याची, आनंद दृष्टीची आणि निर्णय-विचारांची जबाबदारी पूर्णांशानं कळते आणि आपली कहाणी सुफळ संपूर्ण होते.