मापन ही आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत गोष्ट! रोजच्या आयुष्यात मुलं नकळत मोजमाप करतच असतात. मुलांच्या अनुभवांचं बोट धरून मापन शिकविले तर सहजच मुलांची चांगली समज तयार होऊ शकते. मुलांमध्ये मापनाची समज विकसित व्हावी म्हणून पालकनीती परिवारच्या खेळघर या प्रकाल्पात कोणते सर्जनशील उपक्रम घेतले जातात याबद्दल या फिल्म मध्ये बघायला मिळेल.