शिकण्या –शिकवण्याच्या प्रक्रिये संदर्भातले एक उदाहरण या फिल्ममधून आपल्याला बघायला मिळेल. पालकनीती परिवाराच्या खेळघरातल हे उदाहरण आहे. मुलांना शिकण्यातला आनंद समजावा, त्यांना आपण होऊन शिकावंसं वाटावं, जे वाटलं, जे समजल ते त्यांनी मोकळेपणान व्यक्त करावं यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो. हे सगळ जमायचं तर वर्गातलं वातावरण कसं असायला हवं? त्यातला शिक्षकाचा रोल नेमका काय आहे हे तुम्हाला या फिल्ममधून बघायला मिळेल.