‘Vowels of the people association’  ( Vopa) ही संस्था तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या संख्येने शिक्षकांपर्यंत पोचून काम करते.

या संस्थेने ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर तुम्ही बोलाल का? तुमचा व्हिडिओ बनवूया का? असे विचारले होते.

गेल्या ३५ वर्षांत पालकनीती मासिकामध्ये आम्ही या विषयावर भरपूर काम केले आहे. या अभ्यासातून आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम आणि सकारात्मक शिस्त ही पुस्तके देखील तयार झाली आहेत. या कामातून  हाती आलेल्या दिशेनुसार गेली २८ वर्षे पालकनीतीच्या खेळघराच्या प्रत्यक्ष मुलांबरोबर कामही केले आहे.

ह्या व्हिडिओजची रचना तीन भागांतून व्हावी असे वाटले.

१) शिस्त लावण्यासाठी शिक्षा आणि बक्षिसे हा मार्गच नव्हे

२) मुलांसमवेत आनंदाने जगण्यासाठी स्वतःमध्ये रुजलेली  असायला हवीत अशी मूल्ये.

३) वापरता येऊ शकतील अशा काही युक्त्या.

वोपा संस्थेने बनवलेल्या या व्हिडिओच्या तीनही लिंक्स जोडत आहोत.

आपला प्रतिसाद जरूर कळवावा !