खेळघराच्या छोटेखानी जागेत काल थेट भेट कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साकार झाला.
कार्यक्रमाची आखणी आणि कार्यवाही खेळघराच्या युवक गटाच्या मुला – मुलींनी मिळून केली होती. तनिष्का आणि शीतल यांनी कंपेरींग केले.
सुरवातीला युवक प्रकल्पाच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल राजश्रीने मांडणी केली.
गेल्या वर्षभरात मुलाना युवक गटात मिळालेल्या social exposures मधून काय शिकलो याची मांडणी मोनिका आणि प्रियंका या मुलींनी केली. नर्मदा बाल मेळा, Bebak Collective चे वर्कशॉप, पन्हाळ्याचे युवा जागर वर्कशॉप, लोकशाही उत्सव अशा उपक्रमांमध्ये मुलानी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.
नंतर मुलांनी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल, स्वप्नांबद्दल ppt च्या सहाय्याने मांडले.
श्रुती या आमच्या सीनिअर विद्यार्थिनीने तिच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल त्यातल्या चढ- उतारांबद्दल इंग्लिशमधून मांडणी केली.
दीपक, शुभम , लक्ष्मी, सचिन या सीनिअर विद्यार्थ्यांच्या मांडणीने नुकत्या दहावी झालेल्या मुलांसमोर रोल मॉडेल उभे केले आहे.
त्यानंतर दहावी, बारावी आणि डिग्री परीक्षा पास झालेल्या मुलांना त्यांच्या उपयोगाची छोटी गिफ्ट देऊन कौतुक केले.
शेवटी मुलांनी एक सुंदर डान्स करून दाखवला.
मुले आणि पाहुणे यांच्या प्रश्र्नोत्तरांच्या रूपातल्या संवादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मुलांची energy, उत्साह आणि आनंद आम्हा सगळ्यांना देखील उमेद देऊन गेला.
आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचे खेळघरावर निरतिशय प्रेम आहे. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास आणि उत्साह त्यानाही खूप समाधान देऊन गेला.
ज्यांना कार्यक्रमाला काही कारणाने येता आले नाही त्यांच्यासाठी थोडक्यात लिहिले आहे …



