कला कशासाठी ….
जगण्याचा वेग प्रचंड वाढतोय. आज सगळेच जण कशा ना कशाच्या मागे धावताना दिसताहेत – विशेषतः पैशाच्या, प्रतिष्ठेच्या. असं धावताना कपडालत्ता, खाणंपिणं, करमणूक यात रमताना कधी ना कधी पैशाचं फोलपण जाणवतं. एक पोकळी निर्माण होते. जगणं निरर्थक वाटू लागतं. या पोकळ, चकचकाटी जगात माणसातलं सत्त्व, माणूसपण कसं जपलं जाईल? आपलं आयुष्य अर्थवाही करण्याची, हे जग सुंदर करण्याची ताकद कशात आहे?