गाव, गोठा, सेलफोन, सायबर …
नव्या संपर्क साधनांमधेच माहितीजालासकट करमणुकीची साधनं एकजीव झाली आहेत. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट ही दुधारी शस्त्रं झाली आहेत. त्यांची एक बाजू आवश्यक सोयीस्कर वाटतेय तर दुसरी बाजू नकळत नकोसा परिणाम करते आहे. आसपासच्या माणसांपासून तोडून प्रत्येकाला त्याचं स्वतंत्र, खाजगी, गुप्त असं एक जग बहाल होतं आहे. त्यामुळे संपर्कासाठीची ही साधनं व्यक्तीला समाजापासून वेगळं काढून प्रत्येकाचं स्वतंत्र चकचकीत जग देऊ करतायत. मग ते पोकळ, खोटं का असेना.