बालचित्रांची श्रीमंत भाषा
जगभरच्या चित्रकारांनी काढलेली अनेकोनेक पुस्तकं आपण मुलांना जर दाखवू शकलो, दाखवत राहिलो, तर मुलांची चित्रसंवेदना अधिक बहरेल यात शंका नाही. लहानवयात मूल जसं सहजपणे मातृभाषा शिकतं, आसपास बोलल्या जाणार्या अनेक भाषा ऐकतऐकत बोलायलाही लागतं, तसंच ही चित्रांची जाणीव त्यांच्या मनात सहजपणे रुजेल. म्हणून ही चित्रांची श्रीमंत भाषा आपण नक्कीच त्यांच्यासाठी जवळ आणून द्यायला हवी, उपलब्ध करून द्यायला हवी.