लिहावे नेटके
भाषा ही आपल्यासाठी श्वासाइतकी जवळिकीची गोष्ट. आपल्या जन्मापासूनची कदाचित त्याही आधीपासूनची. पण भाषेचा वापर करताना अक्षम्य म्हणावा असा ढिसाळपणा अनेकदा होताना दिसतो. जाहिराती, दुकानांच्या, सूचनांच्या पाट्या अगदी गंभीर विषयावरच्या पुस्तकात देखील असा ढिसाळपणा आढळतो. तो टाळण्यासाठीच भाषेच्या व्याकरणाकडे लक्ष द्यायला हवे. पण व्याकरण हा शब्द उच्चारतानासुद्धा तोंड वाकडे व्हावे इतकी ह्या विषयाची दुष्कीर्ती आहे. पण लिहावे नेटके या पुस्तकामुळे आता मुलांचा आणि मोठ्याचाही भाषेकडे पाहण्याचा, लिखाण शुद्ध असावं हे काटेकोरपणे पाहण्याचा कल वाढेल असं खात्रीनं वाटतं.