ऋषिकेश दाभोळकर- देनिसच्या गोष्टी- सारिका जोरी
खेळघरमध्ये माध्यमिक गटात गोष्टी सांगण्यासाठी ऋषिकेश दाभोळकर आले होते. सलग दोन दिवस मुलांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या देनिसच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. ऋषिकेश दादांनी मुलांचा कल समजून घेऊन खूप चांगल्या प्रकारे गोष्टी सांगितल्या. देनिस त्यांच्याच वयाचा असताना त्यांने केलेली मजा, गमती-जमती या गोष्टीरुपात सांगितल्यावर मुलांचे अनुभव जाणून घेण्यास मदत झाली. तसेच मुलांच्या स्वतःच्या अनुभवाची जोडणी झाली. मुले यातून बोलू लागली. तसे पाहता मोठ्या मुलांसाठी गोष्ट सांगणे थोडे कठीणच वाटते परंतु ऋषिकेश दादांनी खूप चांगल्या प्रकारे गोष्टी सांगितल्या. मुलांना गोष्टींच्या रूपाने पुस्तके कशाप्रकारे वाचली जातात हे समजले.