सपना वाघमारे (Travel and tourism कोर्स, दुसरे वर्ष)
जेव्हा मी शाळेत होते, ते आयुष्य वेगळंच होतं. ते शिक्षक, त्या मैत्रिणी, खेळघरच्या ताया, खूप मज्जा यायची. जेव्हा मी दहावी पास झाले, तेव्हा वाटले की आता मला नवीन जग बघायला भेटेल. माझी एयर होस्टेस व्हायची इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे मी माझ्या स्वप्नातून बाहेर पडले. मग मी काय शिकता येईल हे शोधायला निघाले. मी अनेक कॉलेजांमध्ये जाऊन चौकशी केली. खेळघरात मिटिंग झाली तेव्हा काकूंनी मला travel and tourism च्या कोर्सबद्दल माहिती दिली. शिवाय हा कोर्स माझ्या एयर होस्टेसच्या स्वप्नाच्या थोडा जवळ जाणारा होता. मग मी ठरवले मी तेच करणार! मात्र प्रत्यक्षात त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. जेव्हा कॉलेज सुरू झालं तेव्हा तेथील इंग्लिशमुळं माझं डोकं भाजून निघत होते. माझे इंग्रजी खूपच कच्चं होतं. काकूंनी मला spoken english चा कोर्स करण्याबद्दल सुचवलं. खेळघरानं फी साठी मदत केली. खेळघराच्या तायांनीही खूप मदत केली. कोर्सच्या पहिल्या वर्षाची परीक्षा मी पास झाले आणि मला खूप आनंद झाला. Yess! मी करू शकते!
खरंच खेळघर ही support system आहे माझ्यासाठी!