देशोदेशींची मुलं म्हणतात –
आमच्या बाबांनी सैनिक व्हावं
हे आम्हाला अजिबात आवडत नाही.
कशाला!!
दुसर्याी मुलांच्या बाबांना मारायला?
—स्वीडन.
शांतता….तुमच्या दिशेनं तिला वाहू दे.
तुम्हाला स्पर्शून मग वितळवू दे.
नव्यानं आकार देण्यासाठी
—घाना.
निर्माण करता येत असताना नष्ट कशाला करायचं?
शांती राखता येते तर वैर कशाला धरायचं?
—-अमेरिका.
माझ्या आईच्या गर्भातून मी बाहेर आलो,
जीवनासाठी आक्रंदत.
मी जगलोय हे खूप चांगलं आहे.
पण शांतता? ती कुठं आहे?
—युगांडा.
ज्या कारणानं माणूस पहिल्यांदा दुसर्याूशी आक्रमक वागला
ते कारणच मला थांबवता आलं असतं
तर जग आज शांततेत नांदलं असतं.
—सौदीअरेबिया.
आता युद्ध कशाला हवीत?
ती तर पूर्वी घडून गेलेलीच आहेत.
—यु.के.
सगळ्या जगानं वाटून घ्यावी अशी चीज आहे शांतता.
फक्त प्रेमाचा मुद्दा आहे.
इतरांची कदर करण्याचं आव्हान तुमच्यापुढे ठेवतोय… स्वीकारता?
—अमेरिका.
घेऊया धागे…समानता प्रेम आणि अहिंसेचे
विणता येतील मग सुंदर शांततारूपी वस्त्रे.
—भारत.