स्वयंसेवी कार्यकर्ते कार्यशाळा

मित्र मैत्रिणींनो,

आपल्या सभोवतालच्या वंचित समाजासाठी, मुलांसाठी आपणही काहीतरी करावे असे आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते. परंतु अनेकदा त्याला प्राधान्य मिळू शकत नाही.गेली ३० वर्षे पालकनीती परिवारच्या, पालकनीती मासिक आणि खेळघर प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही काही कार्यकर्ते स्वयंसेवी पद्धतीने काम करत आहोत. त्यातून आम्हाला भरपूर आनंद आणि समाधान लाभले आहे. कामाच्या या टप्प्यावर आम्हाला असे आवर्जून वाटते की ज्यांच्या मनात अशा कामाची इच्छा आहे त्यांना आमच्या अनुभवांचा उपयोग व्हावा.यासाठी काय काय करता येईल? कसे एकत्र भेटता येईल? आपण एखादे workshop घेऊयात का?ज्यांना अशा काही कामात सहभागी होण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी या मुद्द्यांवर बोलण्यासाठी एकदा ऑनलाइन भेटावे असे वाटते आहे. २४ जून २०२३ ला शनिवारी सायंकाळी ७-८ या वेळात एक online मीटिंग प्लॅन करत आहोत. आपल्याला जर या विषयात रस असेल तर खालील google form 22 जून २०२३ पर्यंत भरून पाठवावा. ही सगळी process सगळ्यानी मिळूनच प्लॅन करूयात. भेटू.Google form link –https://forms.gle/YSUwajE1EQE6GDdMA

आपली,उषा खरे आणिशुभदा जोशी(पालकनीती परिवारच्या वतीने)

संपर्क- उषा खरे (7709924275)