पर्यावरणव्रती कुसुम

पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठं काम असलेल्या कुसुमताई कर्णिक जाऊन वर्ष झालं. त्या निमित्तानं ‘पर्यावरणव्रती कुसुम, पर्यावरण रक्षण आणि…’ हे पुस्तक अमित प्रकाशनानं प्रकाशित केलं. ह्याचं संपादन ‘मिळून सार्‍याजणी’च्या डॉ. गीताली वि. म. ह्यांनी केलेलं आहे. त्यात कुसुमताईंच्या आठवणींचा भाग आहे, तसेच Read More

पर्यावरण विषय मुलांपर्यंत नेण्याचा प्रवास

मृणालिनी वनारसे पर्यावरण-शिक्षण हा विषय व्यापक आहे. त्यामुळे आपल्याला मुलांपर्यंत नेमकं काय पोचवायचं आहे हे त्या क्षेत्रात काम करणार्‍याला ठरवावं लागतं. मी कामाला सुरुवात केली तेव्हा ‘आपण आणि आपला भवताल याविषयी जाणीव-जागृती’ हे उद्दिष्ट ठरवणं गरजेचं आहे असं मला वाटलं. Read More

संवादकीय – जुलै २०२४

माणूस आणि निसर्गाच्या नातेसंबंधांवर बोलताना आपण सहजच परस्परावलंबित्व हा शब्द वापरतो. एका काळी त्यात सत्य असेलही; पण आत्ताच्या घडीला माणूस जेवढा निसर्गावर अवलंबून आहे त्या प्रमाणात निसर्ग खचितच माणसावर अवलंबून नाही. त्यामुळे माणसासाठी तरी ते फक्त परावलंबित्वच आहे असं दिसतं. Read More

नवे बदल स्वीकारताना…

जून महिन्यात वर्गात नवीन मुले येतात, बॅचेसची रचना बदलते, पुढच्या वर्गाची वेगळी ताई असते, असे सगळे बदल आत्मसात करून वर्ग सुरळीत होणे हे आव्हानच असते.या वर्षी आम्ही जून साठी मी आणि खेळघर अशा module ची आखणी केली होती.मुलांना स्वतःची ओळख Read More

उषाताई खरे… खेळघराची एक मनमिळाऊ कार्यकर्ती!

उषाताई खरे… खेळघराची एक मनमिळाऊ कार्यकर्ती! आठ वर्षांपूर्वी खेळघरात यायला त्यांनी सुरुवात केली आणि कधी खेळघराच्याच होऊन गेल्या हे कळलंही नाही. ज्या गटाला गरज असेल तिथे मी जाईन असं त्या आपणहून म्हणतात. मुलांशी त्यांची पटकन मैत्री होते. प्रेमानं मुलांना जवळ Read More

स्वयंसेवक, तेजस्विनी शेंड्ये.

तेजस्विनी शेंड्ये आमची मैत्रीण !खेळघराच्या कामाशी ती मनापासून जोडली गेली आहे. सुमारे १२-१४ वर्षांपासून संपर्कात आहे. IT मध्ये अतिशय जबाबदारीच्या पदावर काम करते आहे. कामानिमित्त अनेकदा देशी – विदेशी फिरावे लागते.इतक्या व्यस्त दिनक्रमात खेळघरासाठी काही करावेसे वाटले तरी जमतच नाही… Read More