संवादकीय – जून २०१९

आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे – ‘नाही मागता येत भीक, तर मास्तरकी शिक.’ अध्यापनाकडे, विशेषतः प्राथमिक पातळीवरचे, बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनच ह्यातून व्यक्त होतो. आज एवढ्या वर्षांनंतरही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. पालकांखालोखाल भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असणार्‍या क्षेत्राकडे किमान Read More

कथुली

छोटी सारंगी आता पुढल्या यत्तेत गेली होती. आपण मोठं झाल्याच्या भावनेनं तिला कसं मस्त वाटत होतं. येताजाता आपल्या छोट्या भावावर ताईगिरी करून ती खूष होत होती. शाळा सुरू व्हायला आठवडाच उरला असल्यानं रविवारी सगळं कुटुंब बाजारात जाऊन पुस्तकं, वह्या, कंपासपेटी Read More

अंजू सैगल : शिक्षणक्षेत्रातलं अनोखं व्यक्तिमत्त्व

जून महिना म्हणजे शाळा उघडण्याचा, तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत. त्या निमित्तानं शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या; पण तरीही प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहिलेल्या अंजू सैगल ह्या मैत्रिणीची पालकनीतीच्या वाचकांना ओळख करून द्यावी, असं वर्षा सहस्रबुद्धे ह्या शिक्षणकर्मी मैत्रिणीनं सुचवलं. सूचना अर्थातच Read More

अंजू – एक विलक्षण व्यक्ती

2015 च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईच्या एका हॉटेलच्या लॉबीत अंजूशी झालेली माझी भेट म्हणजे एक अतिशय चांगला योग होता, असं मी म्हणेन. सीकेच्या कामाविषयी समजून घ्यायला आणि त्याविषयी आपलं मत मांडायला माझा एक भाऊ तिला भेटणार होता, आणि त्याच्याबरोबर मीही गेले होते. Read More

गाभार्‍यातला देव

जग समजून घेताना लहान मुलं खूप सुंदर प्रश्न विचारतात. आणि मग त्यांना समजेल अशी उत्तरं देताना आपली जी तारांबळ उडते, त्यातून निर्माण होणारे संवाद निव्वळ अप्रतिम असतात. केवळ कल्पनेचे धुमारे; त्याना कुठल्याच तर्कशास्त्राचं बंधन नसतं. घातलं तर आपणच वेडे! पण Read More

पुस्तक परिचय : डेमोक्रॅटिक स्कूल्स – लेसन्स फ्रॉम द चॉक फेस

डेमोक्रॅटिक स्कूल्स – लेसन्स फ्रॉम द चॉक फेस हे मायकेल डब्लू. अ‍ॅपल आणि जेम्स ए. बीन ह्यांनी संपादित केलेलं पुस्तक नावापासूनच वाचकाची उत्कंठा वाढवतं. निरर्थक अभ्यासक्रम किंवा अविचारी, ताठर व्यवस्थेला शरण न जाता शिक्षण हा विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण जीवनानुभव बनवणार्‍या शिक्षकांची Read More