बाबा लहान होता तेव्हा – भाग १५

बाबाला नेहमीच कसा उशीर व्हायचा! अलेक्झांडर रास्किन  अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  लहान असताना इतर मुलांमुलींप्रमाणेच बाबाही शाळेत जायचा. बाकी सर्व मुलं शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच तिथे पोहोचायची; पण छोट्या बाबाला मात्र नेहमीच उशीर व्हायचा. कधीकधी तर त्याचा अख्खा पहिला तास बुडायचा. Read More

बाबा लहान होता तेव्हा – भाग १४

बाबा शाळेत जाऊ लागला तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  लहानपणी बाबा सारखाच आजारी पडायचा. त्याला झाला नसेल असा एकही बालरोग नव्हता. त्याला गोवर झाला होता, गालगुंड झालं होतं, आणि डांग्या खोकलाही झाला होता. प्रत्येक आजारानंतर त्यात काहीतरी गुंतागुंत Read More

तू काय मुलगी आहेस का?

बसवंत विठाबाई बाबाराव  रोजच्या वेळी काव्याची गाडी फाटकापाशी आली.  “काव्या, चला उतरा… घर आलं!” व्हॅन-काकांनी काव्याला उतरायला सांगितलं.  “आज आमच्यावर नाराज दिसते एक मुलगी… गाडीत काहीच बोलली नाही. अशी शांत बसलेली काव्या असली, की आम्हाला शाळेत गेल्यासारखंच वाटत नाही.”  काव्याने Read More

बाबा लहान होता तेव्हा – १३

बाबा लिहायला शिकतो तेव्हा… बाबा फार लहान असतानाच वाचायला शिकला. ‘हा अ आहे, हा आ आहे…’ असं म्हणत सगळी अक्षरं पटकन शिकला. त्याला खूपच मजा वाटत होती. तो फक्त चित्र बघत थांबला नाही, पुस्तकंच्या पुस्तकं वाचू लागला. पण लिहायला मात्र Read More

आनंदशाळेतल्या गोष्टी – गोष्ट पाचवी

गणित विकतच्या खाऊचं बसवंत विठाबाई बाबाराव  वर्षाच्या बॅगेतून अधूनमधून कुर्रकुर्र… कुर्रकुर्र… असा आवाज यायचा. आवाज अगदी हलकासा असायचा; पण शांत वर्गात तो कानाला लगेच जाणवायचा. आवाज आला की मन्या हळूच वर्षाकडे बघायचा… आणि वर्षा मन्याकडे. दोघांच्या नजरा जुळल्या, की ते Read More

बाबा लहान होता तेव्हा – १२

बाबा त्याची शक्ती अजमावतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  लहान असताना बाबाला खूप मित्र होते. सगळे मिळून रोज एकत्र खेळायचे. कधीकधी भांडायचे, क्वचित त्यांच्या मारामार्‍याही होत. मग परत त्यांच्यात मांडवली व्हायची. पण त्यांच्यात एक मुलगा होता; तो कधीच भांडायचा नाही. त्याचं नाव Read More