शोध शिवाचा जारी…

माधुरी एम्. दीक्षित नाटकाच्या नावात ‘शिवाजीमहाराज’ असले की मनात येतात त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकातल्या गोष्टी, हरहर महादेव इत्यादी. पण नुकतं आलेलं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटक आपल्याला इतिहास सांगत नाही तर इतिहासाकडे डोळे उघडून बघायला सांगतं. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर Read More

मूल हवे – अट्टहास हवाच का? ( आई बाप व्हायचंय? लेखांक – ६ )

डॉ. प्रतिभा कुलकर्णी मूल हवंसं वाटणं ही नैसर्गिक व मानवी गोष्ट. पण मूल होत नसेल, तर तो जीवनमरणाचा प्रश्न का व्हावा? तंत्रज्ञान तर कोणत्याही प्रश्नाची उत्तरं काढायला धावत राहतं, पण त्या उत्तराबरोबर आपण कुठेकुठे वाहावत चाललोय, याचं भान ठेवायला नको Read More

‘अशी’ शाळा कुटं वं भेटंल? (कविता)

मेधा टेंगशे मॅडम, तुमच्याकडची धुन्या-भांड्याची कामं माज्याकडनं, कशी फुलं फुलल्यावानी व्हत्यात – येता-जाता माज्या लेकीची इच्यारपूस करता आन् च्याचा कप देता, हातात ! तुमी म्हंता, ‘बाई, लेकीला शिकवा… आपली आपल्यावर धरील ती सावली ! न्हाय येनार रस्त्यावर, जरी न्हवर्यारनं गुत्त्याची Read More

सप्टेंबर २०१२

या अंकात… संवादकीय – सप्टेंबर २०१२ बीजं तिथंच रुजली होती (माझं काम माझं पालकपण – लेखांक-२) पावसात भिजताना… शोध शिवाचा जारी… मूल हवे – अट्टहास हवाच का ? ( आई बाप व्हायचंय? लेखांक – ६ ) ‘अशी’ शाळा कुटं वं Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१२

शिक्षणहक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासगटातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखून ठेवण्याबाबतच्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं, त्यावेळी त्याचं स्वागत करून त्याच्याविषयी ऊहापोह करणारा लेख आणि संवादकीय मे २०१२ च्या पालकनीतीत आपण वाचलेलं आहेच. खाजगी शाळांच्या प्रस्थापित अभिजनवादी दृष्टिकोनाला (स्वत:ला Read More

जगणे की चैतन्यपूर्ण जीवन व्यतीत करणे? (छाया दातार)

माझं काम माझं पालकपण -लेखांक-१ मागील वर्षी खर्‍या अर्थाने निवृत्त झाले, वयाच्या ६७ व्या वर्षी. छोटी मोठी कामे घेतली आहेत, पण मनाचा स्वस्थपणा आहे आणि म्हणून मागे वळून बघायला आवडेल. प्रश्न आहे, ‘जगण्याचे सार्थक कशात आहे?’ बुध्दाला हा प्रश्न वयाच्या Read More