नसतंयच सोपं
रुजावा अंकुर म्हणून पाहिलेलं स्वप्न चुरगळलेल्या मुठीनं रोज उशाखाली ढकलणं नसतंयच सोपं नसतंयच सोपं घरच्यांनीच खुंटीवर टांगलेलं बाईपण बघणं बोचर्या संशयी नजरा झेलणं कधी स्वत:लाच आरशात पाहताना नजरेला नजर न भिडणं नसतंयच सोपं सोपं अस्तंय ऊर फुटेस्तोवर राबून सगळ्याला दबून Read More
आणि युद्ध संपल्यावर…
नंतर त्या दोन वीरांगना आल्या होत्या सरहद्दीच्या दोन्ही बाजूंनी! डोळे सुजवून रडून भेकून आक्रोश करून आल्या होत्या पण आता शूर आणि सशस्त्र होऊन एकमेकींच्या समोर आल्या काही तावातावाने बोलल्या शस्त्रे अस्त्रे पाजळली… काळ थांबला होता स्तब्ध बघत काय घडणार आता Read More
