पाचगाव

एखाद्या परिसरातील सगळी माणसं एकत्र येऊन जेव्हा त्या परिसराबद्दल, आपल्या उपजीविकेबद्दल, राहणीमानाबद्दल, आनंदाबद्दल सखोल विचार करायला लागतात तेव्हा परिसरासकट सर्वांचं भलं होण्याची शक्यता निर्माण होते. हा विचार जर सतत, अनेक वर्षं नेटानं चालू राहिला तर खरंच सर्वांचं भलं होतं! आपोआप! Read More

पालकत्वाचं इको – लॉजिक (eco-logic)

लहानपणी सुट्टीच्या दिवशी आम्ही मित्रमंडळी कोणाच्या तरी आई-बाबांसोबत घराजवळच्या मुठा नदीत डुंबायला जायचो. वडाच्या पारंब्यांना लटकत, चिंचेचा कोवळा पाला खात, पिंपळाच्या कोवळ्या पालवीच्या पुंग्या बनवत आमची वरात जात असे. अशाच एका सुट्टीत आम्ही नदीत डुंबायला जाऊन आलो आणि अंगाला प्रचंड Read More

व्युत्पत्तीशास्त्र | Etymology

व्युत्पत्तीशास्त्र (etymology) ह्या अभ्यास-शाखेत शब्दांचा इतिहास, त्यांचे कूळ, कालौघात त्यांचे स्वरूप आणि अर्थ यांत कसा बदल होत गेला ह्याचा अभ्यास केला जातो. निरनिराळ्या भाषांत ‘पिता’ या शब्दाला काय इतिहास आहे ते जाणून घेऊया? बहुतांश भारतीय आणि युरोपियन भाषा एकाच भाषिक Read More

मूल वाढवण्यात बाबाचा सहभाग – वाचक प्रतिसाद

‌माणसाचं पिल्लू जन्मानंतर बरेच दिवस मोठ्यांवर अवलंबून असतं. म्हणून मुलं वाढवताना आई इतकाच बाबाचाही वाटा असणं अपेक्षित आहे. बाळ जन्माला आल्या आल्या त्याला स्वतःचं निराळं अस्तित्व कळत नाही. हळूहळू त्याला कळायला लागतं की आपल्या इच्छेनं आपला हात हलतो, मग त्याचा Read More

संवादकीय – जुलै २०१८

काळ : नेहमीचाच. म्हणजे प्रत्येकाचं स्वातंत्र्य, प्रत्येकाची हव्या त्या व्यक्तीच्या तुलनेत समता, प्रत्येकाची आपल्यासारख्यासोबत थोडी बंधुता, ही मूल्यं काही माणसांना पाहिजे तशी जोपासता येण्याचा काळ. वर्ष २०१८ समजा हवंतर. स्थळ : अभियांत्रिकी शिक्षण – नोकरी – स्वतःचं घर – लग्न Read More

आजीआजोबा – आई बाबा – नातवंडंं

पूर्वीची मोठमोठी घरं आणि त्यात राहणारी भरपूर माणसं हे कुटुंबाचं सार्वत्रिक चित्र मागे पडल्याला बराच अवधी उलटून गेलाय. घरांचा आकार आक्रसत गेला तशी त्यात राहणार्‍या माणसांची संख्याही रोडावत गेली. जागतिकीकरणाच्या रेट्यात हा बदल अपरिहार्य म्हणावा असाच. एकत्र कुटुंबाची व्याख्याही बदलत Read More