सांगा, कसं शिकायचं…?

भाऊसाहेब चासकर ‘‘अभ्यासाला बसले का अभ्यास करून देती नाही. नुसती कामं सांगत्यात…’’ ‘‘कामाला घरी राह्य, शाळेत जाऊ नको असं घरचे म्हणत्यात…’’ ‘‘कालच्या राती अभ्यास करीत बसले व्हते, बाप दारू पिऊन आला त्यानं सारी वह्या-पुस्तकं फाडून फेकून दिली.आमाला समद्यांला लई मारलं. Read More

सकारात्मक शिस्त – मार्च २०१४

शुभदा जोशी मुलांनी आनंदात रहावं आणि जबाबदारीनं वागायला शिकावं यासाठी सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींबद्दल या लेखमालेतून आपण जाणून घेत आहोत. या पद्धतींचा आपल्याला खर्‍या अर्थानं उपयोग व्हावा म्हणून मानवी वर्तनासंदर्भातल्या काही मूलभूत गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. मुलांशी कसं वागायचं, ह्याचबरोबर Read More

संवादकीय – मार्च २०१४

आपल्या हातात असर अहवाल आहे. ९६% मुलंमुली शाळेत गेलेली आहेत, मात्र त्यांना शिकवलं किती गेलेलं आहे, येतंय किती या सगळ्या निकषांवर आपलं शिक्षण धबाधबा नापास होत आहे, असं त्यात म्हटलेलं आहे. असरबद्दल काही म्हणावं अशी कल्पना मनात असूनही यावेळी ती Read More

आश्‍वासक आधार

वसंतराव पळशीकर वसंतराव पळशीकर यांना ज्येष्ठ विचारवंत म्हणून आपण ओळखतो. समाज प्रबोधन संस्थेचे कार्यकर्ते, समाज प्रबोधनपत्रिकेचे संपादक, नवभारतचे संपादक, लेखक या सर्व नात्यांनी त्यांनी महाराष्ट्रातील वैचारिक परंपरांचा समग्रतेनं विचार केला आहे. विविध विचारसरणीच्या लोकांबरोबर त्यांचा औपचारिक आणि अनौपचारिक पातळीवर सततचा Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१४

माणसाच्या मना-बुद्धीचं कौतुक आपल्याच काळजात भरून यावं! किती भाषांची निर्मिती केली माणसानं! त्यातल्या अनेक आता नष्टही झाल्या. एकमेकांशी संवादाच्या गरजेतूनच त्या निर्माण झाल्या असतील, नाही?भाषेसोबतीनं संस्कृती वाढली की संस्कृतीसोबतीनं भाषा? अनेक शतकांचा काळ त्यासाठी लागला असेल. त्या त्या समाजाची भौगोलिक Read More

शब्दबिंब

लेखाच्या सुरवातीला आपल्या सर्वांच्या भाषेवर इंग्रजी, हिंदीचा झालेला परिणाम दाखवायला काही वाक्यं लिहावी असं मनात होतं, पण मग वाटलं, की आसपासची कुठल्याही विषयावरची चार-सहा वाक्यं बघितली तरी त्यातून जी गोष्ट ठळकपणे समोर येते, त्या हातच्या काकणाला आरसा हवाच कशाला? इंग्रजीतून Read More