आगामी पुस्तकाबद्दल

‘भाषेकडे बघताना’ हे डॉ. नीती बडवे यांचे नवे पुस्तक आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. डॉ. नीती यांची ओळख अनेकांना जर्मन भाषेच्या तज्ज्ञ म्हणून आहे. त्या अनेक वर्षे सावित्रीबाई फुले विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जर्मन साहित्य, भाषाशास्त्र शिकवत असत. संशोधनाला मार्गदर्शनही करत असत. Read More

भाषा समजून घेताना

किती भाषा आहेत? बॅबेलच्या मनोऱ्याची कथा ही ख्रिस्ती लोककथांमधील एक. या कथेनुसार, सगळ्या माणसांनी मिळून एक मनोरा उभारला. हा मनोरा इतका उंच झाला, की जवळजवळ स्वर्गाला भिडला. त्यामुळे देवाला भयंकर राग आला. सगळी माणसे एकच भाषा बोलत असल्यामुळे त्यांना हा Read More

ग्रेन्युईची गोष्ट

‘ग्रेन्युई’चे अनुभव एक मुलगा होता. त्याचं नाव होतं ‘ग्रेन्युई’. हा मुलगा म्हणजे पॅट्रिक झ्यूसकिंड नावाच्या जर्मन लेखकाच्या ‘द पर्फ्युम’ (1985) ह्या गाजलेल्या ‘बेस्ट सेलर’ कादंबरीतलं मुख्य पात्र. ‘ग्रेन्युई’ला जन्मतः एक देणगी मिळालेली असते. तो वासावासातले सूक्ष्म फरक ओळखू शकत असे. Read More

छोट्यांचे भाषाविश्व

मूल भाषा कधीपासून शिकते? त्याच्या कानावर भाषा पडायला लागल्यापासून? म्हणजे जन्माला आल्याक्षणापासून. की गर्भात असल्यापासून? माहीत नाही; पण त्याच्या कानावर पहिला शब्द पडतो, तेव्हापासून त्याची भाषा शिकायला सुरुवात झालेली असते एवढे मात्र खरे! मुलांचे भाषा शिकणे म्हणजे अनुकरण करणे असते Read More

टेबल म्हणजे टेबल

कुठल्याही समाजात भाषेचा वापर कसा होतो, हे दाखवणारी एक मजेदार गोष्ट आहे. ह्या गोष्टीचं नाव आहे ‘टेबल म्हणजे टेबल’. पीटर बिक्सेल नावाच्या एका स्विस जर्मन लेखकानी लिहिलेली आहे आणि तोच ती इथे सांगतोय. आता मी तुम्हाला एका म्हाताऱ्या माणसाची गोष्ट Read More

‘करक’ भाषेचं पुनरुज्जीवन

प्रस्तुत लेख Language Keepers नावाच्या एका मल्टिमीडिया कलाकृतीवरून तयार केलेल्या पॉडकास्टवर आधारित आहे. Emergence magazine (emergencemagazine.org) या साईटवर या पॉडकास्टची सहा भागांची शृंखला प्रसिद्ध झाली आहे. दोनशे वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियात सुमारे नव्वद भाषा आणि तीनशे बोलीभाषा बोलल्या जात होत्या. आजमितीला त्यातल्या Read More