प्राथमिक शाळांची पाठ्यपुस्तके-एक निरीक्षण

रझिया पटेल आजच्या शिक्षण व्यवस्थेची जी प्रमुख अंगे आहेत. त्यात पाठ्यपुस्तकांना अतिशय महत्व आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेतील अनुकूल बदलाच्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकांचे परीक्षण झाले पाहिजे. शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक बदलांचा विचार करणार्‍यांकडून अशा तर्‍हेचे परीक्षण आणि सूचना काही वेळा येतही असतात. उर्दू पाठ्यपुस्तकांचे Read More

सांगोवांगीच्या सत्यकथा – प्रेम

एका कॉलेजातील प्रोफेसरांनी आपल्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना बाल्टिमोर झोपडपट्टीत जाऊन 200 तरुण मुलांची माहिती आणायला सांगितली. प्रत्येक मुलगा भविष्यांत काय करू शकेल याबद्दल अंदाजही करायला सांगितला होता. प्रत्येकाबाबत विद्यार्थ्यांनी लिहिले होते – फार काही आशा नाही. 25 वर्षांनंतर दुसऱ्या एका समाजशास्त्राच्या Read More

ग्रीक शिक्षणाचा विस्तार …

अरविंद वैद्य आपल्या देशाच्या इतिहासातील काही नावे सगळ्यांच्या परिचयाची असतात. अलेक्झांडर-द-ग्रेट हे असेच एक नाव. अलेक्झांडर हाही ग्रीकच पण ग्रीसचा नव्हे. ग्रीसच्या शेजारीच मॅकडोनिआचा राजा फिलीप याचा हा मुलगा. मॅकडोनिआच्या फिलीपने इ. पूर्व 338 मध्ये ग्रीस जिंकलं. इ. पूर्व 5 Read More

आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम – सुजाण पालकत्वाच्या वाटेवर…

डॉ. संजीवनी कुलकर्णी मुलांना आणि मुलींना वाढवताना, शिकवताना जीवनांतले सुखाचे रंग आस्वादताना, दु:खाचा नेमका आवाका वेधून तेही स्वीकारताना, विविध प्रश्न, अडचणी, आव्हानांना सामोरं जाताना आमिष शिक्षांचे मुकादम काही साधत नाहीत यावर आपण चर्चा केली. ‘तर मग नेमकं काय करायचं?’ या Read More

काशीचा विणकर – एका चरित्राचा शोध

लेखक – सी. एन्. सुब्रह्मण्यम अनुवाद – नीलिमा सहस्रबुद्धे इतिहास हा विषय आपल्याकडे ‘गोष्टीरूप इतिहास’ असाच सुरु होतो. अशा कहाण्यांमधून, गोष्टींतून सापडणारा इतिहास हा इतिहास किती राहतो आणि त्याचं साहित्य किती होतं हा अभ्यासाचाच विषय! रामायण-महाभारत या महाकाव्यांपासून अगदी अलीकडच्या Read More

संपादकीय – ऑक्टोबर १९९८

दिवाळीनंतर आता नवीन वर्षाचे वेध लागतील. जुन्या वर्षाकडून नव्या वर्षाकडे जाताना, आपापल्या परींनी ‘प्रगती’कडे वाटचाल करण्याची इच्छा आपल्या मनात आहेच. ‘प्रगती’ची प्रत्येकाची व्या‘या मात्र वेगळी. मार्गही  वेगळे. मग ते  शिक्षणाचे भारतीयीकरण-राष्ट्रीयीकरण-अध्यात्मिकीकरण (spiritualisation) असो किंवा शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हावेत म्हणून आपल्या Read More