सहभागी व्हा

 

१. खेळघरातील शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणं

– खेळघरातील मुलांसाठी आपण औपचारिक अभ्यास विषय तसेच अनौपचारिक कला, खेळ इ.गोष्टी शिकवू शकता.
– अभ्यास विषयांमध्ये प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांमध्ये मुलांना मदतीची गरज असते.
– संगीत, चित्र, ओरिगामी, शिल्प, नृत्य, नाट्य, पपेट इ. कलांमधील आपले कौशल्य आपण मुलांना शिकवू शकता.
– अभ्यास विषयात मागे पडणाऱ्या मुलांना वैयक्तिक मदत मिळाली तर ती लवकर वर्गाबरोबर येतात.
– दुकानजत्रा, सहली, गॅदरिंग अशा मोठ्या कार्यक्रमात मदत करू शकता.

२. नवे खेळघर सुरु करणे

तुमच्या परिसरातील वंचित मुलांसाठी तुम्ही स्वतंत्र खेळघर सुरु करू शकता. त्यासाठी ती सर्व मदत मही करू.

३. खेळघराची हस्तपुस्तिका अनेकांपर्यंत पोहोचावी म्हणून

शिकण्या-शिकवण्याच्या कामात रस असणाऱ्या प्रत्येकानं ‘आंनदानं शिकण्याच्या दिशेनं’ ह्या खेळघर हस्तपुस्तिकेचा जरूर संदर्भ घ्यावा.
ही पुस्तिका शिक्षक, पालकांपर्यंत पोहचावी म्हणून आपण प्रयत्न करू शकता.