कामाचा सारांश

१९८७ सालच्या जानेवारीपासून सातत्यानं सुरु असलेलं पालकनीती हे छोटेखानी मासिक आहे. पालकनीतीचा प्रवास आजही प्रसन्न संवेदनशीलतेने सुरू आहे. पहिल्या 28 वर्षांनंतर (२०१४ साली) पालकनीतीनं एक नवा प्रयोग सुरू केला. पालकनीतीचं संपादकपणाची धुरा वेगवेगळ्या समविचारी संस्थांनी घ्यावं अशी इच्छा मासिकातून व्यक्त केली. या कल्पनेला प्रतिसाद मिळून 2015 साली प्रगत शिक्षण संस्था, फलटण यांनी तर 2016 साली क्वेस्ट, सोनाळे, वाडा या संस्थेने पालकनीतीच्या संपादनाचे काम केले. त्यानंतर एक वर्ष भारतभरातल्या अनेक बालकारणी संस्थांचा- शाळांचा  परिचय पालकनीतीने वाचकांसमोर आणला. या वर्षातच काही युवक-युवतींनी पालकनीतीच्या संपादनाची धुरा अंगावर घेतली आहे. एव्हाना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फक्त पुण्यातील नाही तर जगात इतरत्र राहूनही काम करता येणे शक्य झाल्याने ही मंडळी जगभरातून कुठूनही काम करतात. केवळ मराठीभाषकच यात आहेत असंही नाही. पालकनीतीच्या आधीच्या संपादकमंडळातले काहीजण तरूणगटाला आवश्यक तिथेच फक्त हवे तर साहाय्य करतात.

पालकनीती मासिकाला 2005 साली महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कार मिळाला होता.