संदर्भ - द्वैमासिक

जगातल्या प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा संदर्भ असतो. निसर्ग, प्रकाश, माणसाची वागणूक; अगदी कलात्मकता आणि भाषा यांनासुद्धा. हा संदर्भ कळला, की जग सुंदर करायची उमेद वाढते, आणि आत्मविश्वासदेखील. हा शोध घेत शिकावे असे ज्यांना वाटते त्या सगळ्यांसाठी हे द्वैमासिक आहे. शाळेत जाणार्‍या मुलामुलींसाठी, शिक्षकांसाठी, आणि शिक्षकाची भूमिका निभावणार्‍या पालकांसाठीही.
संदर्भ सोसायटीच्या संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा.
मुलांमुलींमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढावी यासाठी १९९८ साली शिक्षक, पालक आणि ७वी – ८वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक संदर्भ’ ह्या द्वैमासिकाची सुरुवात पालकनीती परिवाराने केली. ह्या द्वैमासिकात एकलव्य संस्थेच्या ‘संदर्भ’ याच नावाच्या हिंदी द्वैमासिकातले अनेक लेख भाषांतर करून दिलेले असतात. तसेच काही लेख स्वतंत्रपणे योजलेलेही असतात. नंतर सोयीसाठी संदर्भ सोसायटी ह्या नव्या न्यासाची स्थापना होऊन त्यामार्फत हे नियतकालिक सुरू आहे. २०१८ पर्यंत द्वैमासिक छापले जाई.  त्यानंतर सध्या दर आठवड्याला एक लेख व्हॉट्स अप / इमेल केला जातो.

https://www.sandarbhsociety.org/