लोकांचा वैज्ञानिक हरपला.

लोक हेच खरे वैज्ञानिक आहेत, प्रत्यक्ष गावखेड्यांत जगणाऱ्या लोकांकडे पिढ्यान्‌पिढ्यांचे साठलेले शहाणपण असते – त्यामुळे निसर्गाबद्दल, स्थानिक परिसंस्थांबद्दल, पर्यावरणाबद्दल त्यांना खोल समज असते ही भूमिका घेऊन समकालीन चर्चाविश्वातील अनेक मतप्रवाह, रूढ पद्धती आणि प्रस्थापित समजुतींना आव्हान देत त्यांची पुनर्रचना करण्याचे Read More

आदरांजली – विनोद कुमार शुक्ल

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कविता आणि कादंबरी असे दोन्ही साहित्यप्रकार सहजतेने हाताळले. नैसर्गिक साधेपणा हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मध्यमवर्गीय जीवनातले नकळते बारकावे त्यांनी आपल्या लेखणीतून उलगडून दाखवले. ‘लगभग जयहिंद’ हा त्यांचा Read More

आदरांजली – प्रा. डॉ. नरेश दधिच

प्रा. डॉ. नरेश दधिच हे पुण्यातील ‘आयुका’ (IUCAA) संस्थेतील मोठे शास्त्रज्ञ होते हे आपल्या सर्वांना माहीत असेलच. मलाही माहीत होतंच; पण म्हणजे नेमकं काय, ते फक्त समजायलाही, त्या विषयाची काहीएक माहिती नसणार्‍या माझ्यासारख्या व्यक्तीला (मला वाटतं अनेकांना), बरेच श्रम करावे Read More

आदरांजली – डॉ. आनंद करंदीकर

डॉ. आनंद करंदीकर ह्यांचे नुकतेच निधन झाले. ज्ञानपीठ कवी विंदा करंदीकर ह्यांचे पुत्र, आयआयटी मुंबई येथून बी.टेक., आयआयएम कलकत्ता येथून एम.बी.ए. आणि पुढे पी.एचडी, अशी झळझळीत शैक्षणिक कारकीर्द असूनही एवढीच त्यांची ओळख खचितच नव्हती. शांत, विवेकी, संवेदनशील मन आणि तितकीच Read More

आदरांजली – डॉ. जयंत नारळीकर

आमची आयुका पिढी! म्हणजे साधारणपणे आयुकासोबत जन्मलेली पिढी. आम्ही शाळा-कॉलेजात गणित-विज्ञानाशी मैत्री वाढवत होतो तेव्हा आयुकात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू होत होते. म्हणजे तिथल्या सर्व नव्या कोऱ्या गोष्टी आणि उपक्रम अनुभवणाऱ्या विद्यार्थ्यांची आमची पहिली पिढी!   आयुकाचं प्रवेशद्वार आणि लोगो, आतलं Read More

आदरांजली – पद्मभूषण इला भट्ट

महिला अधिकार कार्यकर्त्या आणि सेवा (सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन) संस्थेच्या संस्थापक, पद्मभूषण इला भट्ट ह्यांचे मध्यंतरी निधन झाले. गांधींच्या विचारांचा पगडा असलेल्या इलाबेन ह्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते, तसेच ‘हिंदू लॉ’ ह्या विषयात सुवर्णपदक मिळवले. टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या महिलांना Read More