चौकटींचे कागद – एक अनोखे गणिती साधन

१०० रुपये

या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच  गणितातील निरनिराळ्या संकल्पनांचे दृढीकरण करण्यासाठीची ही एक छोटेखानी अनोखी पुस्तिका आहे.

गणिती विचार हा अमूर्त असतो. मुलांच्या गणिती संकल्पना, संख्यांची समज नीट विकसित झालेली नसते. मुले संख्या लिहू लागली की आपण चौकटीच्या वह्यांचा वापर सुरू करू शकतो. याच वह्या विविध गणिती संकल्पनांच्या स्पष्टतेसाठी वापरता येऊ शकतात. या पुस्तिकेत संख्या समजेपासून ते अवयव, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, क्षेत्रफळ इत्यादी संकल्पना स्पष्ट करण्याबद्दलची चर्चा केली आहे. सोबत अनेक सरावपत्रिकाही दिल्या आहेत. त्यावर आधारित किंवा नवीन सरावपत्रिका आपणही सहजपणे करू शकाल ही आशा आहे.