माझी गोष्ट : कृती पुस्तिका

२० रुपये

मुलांच्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘मी’ आणि ‘माझी गोष्ट’ या पासून या पुस्तिकेची सुरुवात होते. मग याच्या जोडीला नेहमी लागणारी मुळाक्षरे आणि काना यांचा परिचय आणि सरावही यात होतो. स्वत:च्या घरातील व्यक्तींसंदर्भातील शब्द आणि वाक्ये यांची वारंवार ओळखही होत जाते. त्यामुळे काही शब्द आणि वाक्ये मूल सहजपणे वाचू लागते.

ही पुस्तिका शिक्षकांनी कशी वापरावी यासाठी काही सूचनाही दिल्या आहेत. ‘माझी गोष्ट’ हे मुलांचे स्वत:चे असे खास पुस्तक आहे. या पुस्तकाच्या आधारे मूल लिपीच्या उंबरठ्यावरचे कठीण वळण सहजपणे ओलांडेल अशी आशा आहे.