सकारात्मक शिस्त
७० रुपये
मुलांबरोबर काम करताना शिक्षकांना सर्वात सतावणारा प्रश्न म्हणजे वर्गनियंत्रण कसे करावे? कधीकधी मुलं अजिबात ऐकत नाहीत, सतत एकमेकांशी बोलत असतात, काही दंगेखोर मुलं वर्ग विचलित करतात. अशा वेळी शिकवणं शक्यच होत नाही. मुलाचं सहकार्यही मिळत नाही. पण मग करायचं काय…मुलांना शिस्त लावायची कशी आणि तीही सकारात्मक पद्धतीने…या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तिकेच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतील अशी आशा आहे. सकारात्मक शिस्तीची संकल्पना शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत किती चांगल्या पद्धतीने उपयोगी पडते हे आपल्याला जाणवेल.