प्रतिसाद – डिसेंबर २००३
मी गतिमान संतुलनची नियमित वाचक आहे. २३ सप्टेंबरच्या अंकातील फटाके विरोधी मोहिमेचे निवेदन मी वाचले. मी गृहिणीच आहे. पण मला सामाजिक जाणीव ठेवून काम करायला आवडते. मी लेखिका नाही पण कृती करून मग बोलायला आवडते. आपल्या देशात स्त्रिया हौसेच्या नावावर खूपच पैसे खर्च करत असतात व ही संपत्ती वाया जाते. दुसरं म्हणजे जगात सोनं व चांदी हे दोन धातू टिकाऊ आहेत म्हणून संपत्तीचा साठा होतो व ती पडून राहाते. आपल्या देशात अनेक ठिकाणी अनेक वर्षे गटागटाने अनेक चांगली कामे सुरू आहेत. पण सर्वांचा सर्वाधिक वेळ हा निधी गोळा करण्यात जातो. व अनेक चांगली कामे संपत्ती अभावी बंद पडतात. मी गजानन पेंढारकरांचं एक वाक्य माझ्या डायरीत लिहून ठेवलंय की “लक्ष्मीला तिजोरीत बंद करून ठेवण्यापेक्षा तिला इकडे तिकडे बागडूद्यावं, त्यात विकासाची फळे आहेत.” दसऱ्याला सोनं लुटायची आपली प्रथा आहे. सर्वजण आपट्याची ओरबाडून आणलेली पाने देतात. हेमला मुळीच आवडत नाही. दुसरे देतात म्हणून आपणही ते द्यायचे हे योग्य नाही. मी मध्यमवर्गीय आहे. मी पैसे मिळवत नाही. पण आपणहून द्यायचं तर सणानिमित्त १ तोळा सोनं सामाजिक कामांना भेट म्हणून देऊ, हा माझा ठराव माझ्या गावात पास होत नाही. मी तुमच्या कामासाठी अशी भेट देणार आहे. तुम्ही दर महिन्यात एकदा पालकांना बोलावता व काही विचार मांडता त्यात हा माझा प्रस्ताव वाचून दाखवाल का ?
मी जानेवारीत शुभदा जोशी यांना भेटले, त्यांचे खेळघर पाहिले. मला फारच आवडले. तेव्हापासून हे माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावे असे मनात होते म्हणून या पत्राचा खटाटोप.
एक वाचक..
सप्टेंबरच्या अंकातील ‘शिक्षा’ हा वृषाली वैद्य यांचा लेख वाचला. सामाजिक रीतीविरुद्ध वागणाऱ्यांना हल्ली फार | महत्त्व आले आहे. मग ते बरोबर की चूकत्याचा विचार गौण असतो. त्यांनी केलेली गंमत व त्याबद्दल झालेली शिक्षा- जास्त प्रमाणात होती हे कबूल. परंतु संबंध लेखामध्ये आपली गंमत करताना चूक झाली व ह्यानंतर आम्ही आमची | शक्ती चांगल्या कामाकडे वळवू असे मुलींनी बाईंना सांगितल्याचा उल्लेख नाही. तेव्हा कदाचित त्यांचे वय लहान असेल परंतु लेख लिहिताना वाढलेल्या वयात सुद्धा हीच भावना ? पालक व शाळा प्रमुख यांच्या दृष्टिकोनाचा विचार नाही. लहानपणी मुली भातुकली-लभ-नवरा-नवरी हे खेळ खेळतात. हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु वय ९ – १० च्या | आसपास थोड़ी समज आल्यावर ला पत्रिकेचा खेळ खेळणे ही गंमत वयाच्या मानाने चुकीची वाटते.
असो, ‘गंमत’ म्हणून केले, ठीक आहे. कधी भावनेच्या भरात असं घडतं (मोठेसुद्धा चुका करतात) परंतु त्यानंतरचा त्यांचा हलगर्जीपणा, कागदाचे तुकडे तुकडे अर्धवट करून फेकून देणे हे निष्काळजीपणाचे लक्षण होय. आपल्या हातून चूक झालीच नाही अशा थाटात सर्व लिखाण आहे.
उपमुख्याध्यापकांनी कडक शिक्षा दिली. खरं म्हणजे त्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी असं हल्लीच्या तत्वज्ञानांत |आहे. त्याकाळात ह्या कल्पना नव्हत्या. परंतु तुम्ही मुलींनी जर त्यांची माफी मागून, चुकून अशी गंमत झाली, आम्ही आता असं करणार नाही असा शब्द दिला असता तर कदाचित संधी मिळाली असती.
त्या सर्व गोष्टीनी लेखिकेच्या मनात चीड निर्माण झाली व बंडखोर वृत्ती तयार झाली. बंडखोर जरूर बना, अन्यायाविरुद्ध जरूर लढा द्या. परंतु गंमत करताना वयाचा विचार करता त्याकाळी जरा जास्त शहाणपणा होता असं पालक व | शाळाप्रमुखांना वाटणं स्वाभाविक आहे.
– एक ज्येष्ठ नागरिक
संवादकीय – डिसेंबर २००३
डिसेंवरचा अंक वर्षाखेरीचा अंक असतो. मागे वळून पाहण्याचा सरत्या वर्षाकडे निसटत्या वास्तवाकडे गेल्या वर्षात काय काय घडलं, सुरुवातीला काय होतं, हे बघण्यासाठी म्हणून मागील वर्षीच्या डिसेंबर अंकाकडेनजर टाकली आणि ज्याला मानसशास्त्रात ‘देजा वू’ म्हणतात तसं वाटलं
म्हणजे परीक्षेत अगदी मागच्या वर्षीचीच प्रश्नपत्रिका यावी, गाळलेल्या जागा भरायला तसंच काहीसं घटना त्याच फक्त नाव बदललेली अफगाणिस्तानऐवजी इराक गुजरातरेजी असाम, बंगारूऐवजी जूदेव, सिंघलऐवजी तोगडिया देशमुखऐवजी शिंदे, तेलगीऐवजी फक्त नावं बदलली की वास्तव तसंच दिसतं. दुर्दैवानं तेवढंच वाईट तेव्हा असं वाटलं की त्याच्याकडे बघणंच जरा टाळूया. आपण खरंच सामान्य माणसं. सतराशे कोटी म्हटल्यावर आपण हमखास आणि वारंवार ‘शून्य किती ?’ चा घोळ घालणार.
एक डिसेंबर जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. काहीजण (अगदी नॅशनल एड्स कंग्रेल ऑर्गनायझेशन सुद्धा…) हा दिवस ‘साजरा’ करतात. अवघडायला होतं. गेल्या वर्षात जगभरात ३० लाख व्यक्ती या आजाराला बळी पडल्या…. त्यांच्या स्मृतीत दुःख गांभीर्यानी सहभागी होण्याचा हा दिवस.. आणि भयानक वेगानं अजूनही पसरतच असणान्या या साथीला आपल्या परीने अटकाव करण्यासाठी मनःपूर्वक कंबर कसण्याचा, साजरे करण्याचा नव्हे.
आपल्या एवढ्या प्रयत्नांनंतरही गेल्या वर्षात आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक लागण झाली…. जगभरात सुमारे ५० लाख लोकांना त्यापैकी भारतात किमान ६ लाख जणांना भारतातील एच् .आय् .व्ही. बाधितांची संख्या ५० लाखांच्या आसपास पोचली आहे. हे खरंच भयावह आहे. आपली कुटुंबव्यवस्था समाजव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था सर्वासर्वापर्यंत याचे धागे पोचतात. आणि इतके दूरगामी परिणाम करणारा एड्स हा एकमेव घटक नसतो. बेरोजगारी, भणंगपणा, बाजारू अर्थव्यवस्था, जागतिकीकरण वगैरेसचे परिणाम असेच होतात. होत असतात.
अर्थात याचा अर्थ आपण नाउमेद होऊन हातपाय गाळून बसावं असा मुळीच नाही. ह्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असणारे केवळ आपणच नसतो. आजवर ओळख नसली तरी आपले जीवाभावाचे मित्रच म्हणावेत असे लोक भेटतात आणि मनात आनंदाचा लख्ख प्रकाश पडतो.
गेल्या महिन्यात अशीच एक संधी मिळाली. नेटवर्क या गटामधे सहभागी होण्याची. दक्षिण भारतात पर्यायी शिक्षणासंदर्भात काम करणाऱ्यांचा हा गट आहे. त्यात महाराष्ट्रातलेही १०-१२ जण आहेत. ही मंडळी वर्षातून एकदा २-३ दिवसांसाठी आपापल्या खर्चानं एकत्र जमतात. शिक्षणाच्या विषम संधी शिकण्यातून मिळणाऱ्या आनंदाला पारख करणारं सध्याचं चाकरीबद्ध शिक्षण, जगण्याशी, परिसराशी आणि एकंदरीतच विचारांशी फारकत करणारी असंवदेनक्षमता अशा मुद्यांसंदर्भात वाटणारी अस्वस्थता हा या गतला एकत्र आणणारा धागा आहे. आपलं काम करताना येणारे अनुभव, आशा निराशा पडणारे प्रश्न याबद्दल बोलायला समविचारी आणि सह अनुभूती घेऊ शकतील असे मित्र मिळणं हा नेटवर्कचा मुख्य उद्देश.
कुठे कुठे काय चाललं आहे. नवीन प्रयोग, योजना याबद्दल माहिती तर ओघात मिळतेच पण त्याबरोबरच एखादा विषय घेऊन त्यानिमित्तानं आपले दृष्टिकोन मांडून, पूर्वग्रह तपासून पाहणं हेही या चर्चातून साधतं. उदाहरणार्थ ग्रामीण आदिवासी भागातल्या मुलांना शिकवताना ते आनंदाचं व्हावं, कुतुहल उत्कंठा वाढावी यासाठीचं वातावरण म्हणजे जागा, साधनं, भाषा कलांसंदर्भातले सृजन प्रयोग हे महत्त्वाचं आहेच. त्याचबरोबर ही मुलं ज्या परिस्थितीत वाढतात तिथले प्रश्नं, आव्हानं, मर्यादाही शिक्षकाला समजावून घ्याव्या लागतात.
त्या परिस्थितीतल्या अन्यायाला समर्थपणे तोंड देण्याची ताकद आणि शहाणपण त्या मुलांत विकसित करणं हे शिक्षणाचं खरं आव्हान आहे. ‘निसर्गातनं आपल्या जरूरीपुरतंच घ्यायचं नि ते मिळत राहील यासाठी त्याचं संवर्धनही करत रहायचं, हे आदिवासींचं मूळ तत्त्व आधी आपल्याला शिक्यला लागेल. नाही तर आपल्या प्रचलित व्यवस्थेतलं ‘अधिकाधिक ओरबाडून खिसे भरायचं तत्त्व आपण त्यांना शिकवू इथे शिक्षणाचा संपूर्ण पुनर्विचार करून अभ्यासक्रम आणि पद्धती ठरवाव्या लागतात. नाहीतर निराशा ठरलेलीच. अशा अतिशय महत्त्वाच्या मुद्यांसंदर्भात, स्वतःशी जोडून घेत होणान्या मनमोकळ्या चर्चा खूप दिलासा आणि ताकद देणान्या होत्या. पावलापुरत्या प्रकाशात, चाचपडत धडपडत मार्ग शोधताना आणखी
त्यानंतर काही प्रयोगशील शाळा बघायचीही संधी मिळाली ताराकांची ‘पूर्णप्रज्ञा’ मालती आकांची ‘विकासना आणि जेन साही यांची प्रादेशिक भाषेतली ‘सीता स्कूल’ काळजीपूर्वक जोपासना केलेला निसर्गसंपन्न परिसर, मुलांच्या मदतीनं बांधलेले छोटेखानी वर्ग, मुलांच्या कलाकृतींनी जिवंत झालेल्या भिंती ह्या इथल्या सृजनाची साक्ष देत होत्या.
प्रत्येक शाळेमधे तीस-चाळीस मुलं होती, वेगवेगळ्या वयोगटातली मुलं गरजेनुसार केलेल्या गळंतून एकत्र शिक्त होती. अभ्यासक्रमाचा काच फक्तसातवी आणि दहावीची परीक्षा बाहेरून देऊन उत्तीर्ण होण्यापुरताच होता. डोक्यातली बुद्धी आणि हृदयातल्या भावना यांची सांगड घालून विचार करणं नि आत्मसात झालेल्या विचारांचं कृतीत रूपांतर होणं असा शिक्षणाच्या परिपूर्ण रूपाचा प्रत्यय इथे येत होता.
ताराकांच्या शाळेत जिथं आम्ही राहिलो तिथल्या मुलांचं अंगण तयार करणं माझ्या कायम लक्षात राहील. पावसाळा संपल्यावर दरवर्षीच पुन्हा अंगण तयार करावं लागतं. या वर्षी याच
अंगणात पाहुण्यांसाठी मांडव घालायचा होता. मुलं या कामात तरबेज होती. जमिनीवर बारीक माती आणून टाकणं, ती चोपून सारखी करणं, मग त्यावर शेण मिसळलेलं पाणी शिंपडणं ही सारी कामं मुलं आणि मुली मिळून करत होती.. मुलींचा थोडा पुढाकार होता पण मुलंही मागे नव्हती. उत्साहानं अजिबात न भांडता काम चाललं होतं. मध्येच एका मुलीच्या हातून एका मुलाच्या शर्टावर शेण उडालं, मुलगा अर्थातच रागावला, मला वाटलं झालं! आता भांडण. मारामारी सुरू होणार. पण तसं काहीच झालं नाही. त्या मुलानं मोठ्या ऐटीत उभं राहून त्या मुलीकडून शर्टसाफ करून घेतला.
चोपण्याची पहिली फेरी झाल्यावर मुलांनी वेगळीच कल्पना शोधली. अंगण आणखी अन व्हावं म्हणून मुलांनी त्यावर ओळीनं लयबद्धपणे नाचायला सुरुवात केली. सगळे मिळून सुरेख धून गात होते. शब्द बडबड गीताचे, त्याला धमाल चाल. ओळ एकदा म्हणून होईतो एक आवर्तन पुरं व्हायचं. आनंदानं हसत बागडत सुरेख अंगण तयार होत होतं.
मला क्षणभर आपल्याकडे हे काम कसं झालं असतं त्याची आठवण झाली. मातीत खेळणं राडा चिखल भांडणं नंतर मोठ्यांचा हस्तक्षेप आणि मोठ्यांनीच ते काम पुरं करणं. पण अशा सगळ्या कटकटीशिवाय काही घडतं, घडूशक्तं हे फार छान होतं. त्यासाठी कुणी त्यांच्यामधे वर्षानुवर्ष राहून काम केलं होतं.
हे प्रयत्न, प्रयोग हे सृजनाची बीजं आहेत. यातून प्रेरणा घेऊन ह्या सृजन प्रयत्नांची अधिकाधिक जोपासना व्हायला हवी. आज सर्वदूर जाणवणाऱ्या प्रश्नांची मुळं कुठंतरी बालपणीच्या सृजन शिक्षणाच्या अभावात तर नशीत? मुलांना लहान वयात शिकण्यासाठी पूरक वातावरण न मिळणं, त्यांच्या ऊर्मीला वुकूलाला, उत्कंचेला दिशान मिळणे इथेच खरं तर पाणी मुरतंय. मुर्दाड मन, बोथट संवेदना, बिनधास्त, बेजबाबदारपणामुळे काय परिस्थिती निर्माण होते, ती आज आपल्याला दिसतेय पुखेल काळातली घसरण टाळायची असेल तर मुलांसाठी गंभीरपणे काही करायला हवं. या सृजन बीजांपर्यंत पोचण्यासाठी शुभेच्छा!