बेंजामिनकडे फ्रँकलिन नावाचं गरुड होतं. ती दोघं स्पेनमध्ये राहायची. एक दिवस बेंजामिननं फ्रँकलिनसोबत इजिप्तच्या वाळवंटात फिरायला जायचं ठरवलं. ती दोघं प्रवासाच्या तयारीला लागली.
बेंजामिननं कपडे बॅगेत भरले. फ्रँकलिननं टोपी घातली आणि डोळ्याला काळा चष्मा लावला. बेंजामिननं सोबत भरपूर पाणी घेतलं.
वाळवंटात दोघं लपाछपी खेळली. बेंजामिन पिरॅमिडच्या मागे लपला. फ्रँकलिन वर उडाला आणि त्यानं बेंजामिनला वरून पाहून आउट केलं. दुपार झाली होती, पाणी संपलेलं. दोघांना तहान लागली होती. फ्रँकलिन उंच उडाला आणि कुठं निवडुंग
दिसतात का पाहायला लागला.
त्याला माहीत होतं, की निवडुंगाच्या आत पाणी असतं.
शेवटी त्याला एक निवडुंग दिसलं.
त्याचा एक भाग तोडून तो बेंजामिनसाठी घेऊन आला.
आपल्या अणकुचीदार चोचीनं त्यानं ते निवडुंग कापलं आणि दोघांनी त्याच्या आतला भाग खाल्ला. त्यानंतर त्यांचा आनंददायक प्रवास पुन्हा सुरू झाला.
आदित्य संजय दीक्षित
कमला निंबकर बालभवन, फलटण
सहावीत असताना (2018) लिहिलेली मूळ इंग्रजी कथा- Benjamin and Franklin (Theme- Pets)