आदरांजली – प्रा. शाम वाघ

नूतन बालशिक्षण संघाचे आधारस्तंभ, प्राध्यापक आणि व्यवस्थापनतज्ज्ञ शाम सदाशिव वाघ (69) यांचे 16 नोव्हेंबर 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बालशिक्षणातील महत्त्वपूर्ण नाव असलेल्या पद्मश्री अनुताई वाघ यांनी आदिवासी मुलांच्या बालशिक्षणाची पायाभरणी केली. ते कार्य प्रा. शाम वाघ यांनी सुरू ठेवले होते व त्याचबरोबर त्याचा विस्तारही केला. समाजभान जपणार्‍या व कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार असणार्‍या प्रा. शाम वाघ ह्यांचे हे आकस्मिक जाणे अनेकांना चटका लावून जाणारे आहे. 

व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि लोकसंवादातील सहभाग यासाठी त्यांनी पोलीस दलातील कर्मचार्‍यांची शेकडो प्रशिक्षण शिबिरे घेतली. स्त्री शिक्षणासाठी खखचझAउढ या संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी काम केले आहे.

शाम वाघ हे पालकनीती मासिकाचे वाचक मित्र! पालकनीतीच्या खेळघर प्रकल्पाला त्यांनी त्यांच्या शशिकला फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे आर्थिक मदत केली. 2019 मध्ये खेळघराच्या ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’  या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन शाम वाघ यांच्या हस्ते झाले होते.

पालकनीती परिवारातर्फे प्रा. शाम वाघ ह्यांना मनापासून आदरांजली!