आनंदाची बातमी – शिवाजी कागणीकर मानद डॉक्टरेट

बेळगाव भागात शिक्षण, जलसंधारण आणि रोजगार यासाठी सतत कार्यरत आणि संघर्षरत असलेले शिवाजी कागणीकर यांना कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज विद्यापीठाने मार्च 2023 मध्ये मानद डॉक्टरेट प्रदान केली. आपल्याला आठवत असेल, 2003 साली पालकनीतीचा सामाजिक पालकत्व पुरस्कार दिला होता तेव्हा त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेतले होते. नंतर शिक्षणासाठी धडपड करणार्‍या लहानग्यांचे विश्व त्यांनी लेखातून आपल्या अंकात मांडले होते. आजही जैविकशेती आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यासाठी त्यांचे काम अव्याहत चालू आहे.

शिवाजीभाऊंच्या कामाला आमचाही सलाम.