खेळघराच्या वाचन चळवळीचे पुढचे पाऊल

मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून खेळघरात गेली काही वर्षे प्रयत्न करत आहोत. आम्ही शिक्षकही खूप वाचतो. त्यावर चर्चा करतो. आम्ही वाचलेल्या गोष्टी मुलांना सांगतो. मुलांबरोबर पुस्तके वाचतो, त्या संदर्भाने activities घेतो. तरीही मुले खेळघरात दोन तासांकरताच येतात. त्यातही अनेक विषयांवर काम चालते. त्यांना आणखी पुस्तकांचा सहवास मिळायला हवा असे मनापासून वाटत होते. खेळघराच्या पालकांनी हे आव्हान स्वीकारले. काल १० पालकांनी *पुस्तक पेटी* च्या कामाची जबाबदारी स्वीकारली. साधारण ५०-६० पुस्तके, चित्रे काढायला सामुग्री, नोंदिंसाठी वही… अशी ही पेटी पालकांना घरी दिली आहे. ते आठवड्यातून दोनदा त्यांच्या घरातच त्यांच्या स्वतःच्या आणि आजूबाजूच्या मलांसाठी वाचनालय चालवणार आहेत. पुस्तकांची आमची ही चळवळ आता आणखी मुलांपर्यंत पोचेल. पालक हे काम स्वयंसेवी पद्धतीने करणार आहेत हे विशेष! या वर्षी आम्ही खेळघरात पुस्तकांचा गणपती बसवला आहे. या प्रदर्शनात इतर अनेक पालकांच्या समोर काल पुस्तक पेटी कार्यक्रम साजरा झाला. या निमित्ताने पालकांनी त्यांची मनोगते मांडली.रोटरी क्लबच्या मदतीमुळे आम्हाला या पेट्या मधील पुस्तके विकत घेता आली.