खेळघरातील गुरुपौर्णिमा

ताईने आणि मुलांनी मिळून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे ठरवले. ताईने त्यासाठी वेगवेगळी पाने, फुले नेली होती. मुलांनी वर्गाच्या मधोमध पाना फुलांची रचना केली त्याच्या मधोमध एक मेणबत्ती लावली.सर्व मुलांनी त्या रचने भोवती बसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.ताईने मुलांना विचारले,’ आपले गुरू कोण कोण आहेत? ‘ मुलं म्हणाली ,’ आई,वडील,शिक्षक.त्यावर ताई म्हणाली,या सर्वांसोबत आपल्यापेक्षा एखादं छोटसं भावंडसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून जाते,आपले चांगले मित्र सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवतातच की! यासोबतच आपला सगळ्यात मुख्य गुरुआहे तो म्हणजे. ‘ निसर्ग ‘.निसर्गाने आपल्याला सर्वच गोष्टी दिल्या आहेत.निसर्ग आपल्याला वेळोवेळी शिकवतो आहे.आत्ताच्या होणाऱ्या गोष्टी – पूर, महापूर, अतिवृष्टी,दरडी कोसळणे तर यांतून निसर्ग आपल्याला काही शिकवतो आहे का? यावर मुलं म्हणाली – माणसांनी डोंगरावर घरे बांधली, नद्यांच्या बाजूला बांधकामं केली त्यामुळे निसर्गाचा -हास होत चालला आहे.आपण आपला निसर्ग जपायला हवा,तरच आपण चांगले राहू शकतो. वर्गात ताई आणि मुलांमध्ये चांगली चर्चा रंगली होती.अशा प्रकारे गुरुपौर्णिमा ताई आणि मुलं मिळून साजरी केली.

अनुराधा चव्हाण ताई

हायस्कूल गट २