खेळघर दहावीच्या परीक्षेचा निकाल

खेळघर दहावीच्या परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला आहे.१८ पैकी एक वगळता सर्व मुले उत्तीर्ण झाली आहेत (त्याला अध्ययन अक्षमतेची अडचणआहे)दोन मुलींना ७०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.कोवीड दरम्यान या मुलांना खूप शैक्षणिक अडचणी येत होत्या. आपल्याला काही समजत नाहीये अशा भावनेवर मात करून त्यांनी अभ्यास केला. या गटाचे काम बघणारी अनुराधाताई आणि तिला मदत करणारे सर्व सहकारी आणि कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली. सर्व मुलांचे मनापासून अभिनंदन…….यापुढेही त्यांनी शिकावे यासाठी खेळघर सर्वतोपरी त्यांच्या बरोबर राहील.