शहतूत (Mulberry)


क्या आपने कभी शहतूत देखा है,
जहां गिरता है, उतनी ज़मीन पर
उसके लाल रस का धब्बा पड़ जाता है.
गिरने से ज़्यादा पीड़ादायी कुछ नहीं.
मैंने कितने मज़दूरों को देखा है
इमारतों से गिरते हुए,
गिरकर शहतूत बन जाते हुए
मृत्यु का ख़ौफ़…
ताउम्र मैंने इस बात पर भरोसा किया
कि झूठ बोलना ग़लत होता है
ग़लत होता है किसी को परेशान करना
ताउम्र मैंने इस बात को स्वीकार किया
कि मौत भी ज़िंदगी का एक हिस्सा है
इसके बाद भी मुझे मृत्यु से डर लगता है
डर लगता है दूसरी दुनिया में भी मजदूर बने रहने से।
घर
मैं पूरी दुनिया के लिए कह सकता हूँ यह शब्द
दुनिया के हर देश के लिए कह सकता हूँ
मैं आसमान को भी घर कह सकता हूँ
इस ब्रह्माण्ड की हरेक चीज़ को भी।
लेकिन तेहरान के इस बिना खिड़की वाले किराए के कमरे को नहीं कह सकता,
मैं इसे घर नहीं कह सकता।

सबीर हका
सबीर हका ह्यांचा जन्म 1986 सालचा, इराणमधील करमानशाह इथला. आता ते
इराणची राजधानी तेहरानमध्ये राहतात. तिथे ते इमारतीच्या बांधकामावर मजूर
म्हणून काम करतात. त्यांचे दोन कविता-संग्रह प्रकाशित झाले असून ‘इराण श्रमिक
कविता-स्पर्धे’त त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे. मात्र तरीही पोट भरण्यासाठी
त्यांना मजुरी करावी लागते. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणतात, ‘‘मी थकलोय.
आत्यंतिक थकलोय. मी जन्माला येण्याच्या आधीपासूनच थकलेलो आहे. मी गर्भात
असताना माझी आई मजुरी करायची. तेव्हापासूनच मी एक मजूर आहे. माझ्या
आईचा थकवा मला जाणवतोय. तिचा तो थकवा आजही माझ्या शरीरात आहे.’’
तेहरानमध्ये त्यांना राहायला घर नाही. रात्री झोपायला जागा नाही. कित्येक रात्री ते
रस्त्यावर भटकूनच घालवतात. आयुष्यात पुरेसा निवांतपणा नसल्याने ते आपली
कादंबरीही पूर्ण करू शकत नाहीत. इराणमध्ये अभिव्यक्तीवर निर्बंध असल्याने
सरकार कवी-लेखकांच्या साहित्यावर कात्री चालवते. त्यामुळे अर्धवट, अर्थहीन वाक्ये
तेवढी उरतात.
सबीर ह्यांच्या कवितांकडे आत्ता-आत्ता जगाचे लक्ष गेले आहे. त्यांच्या कविता
कोसळणार्‍या विजेच्या आघाताप्रमाणे भासतात.
‘मॉडर्न पोएट्री इन ट्रान्सलेशन’ (Modern Poetry in Translation – MPT) हे
कवितेच्या जगतातील प्रसिद्ध मासिक. ह्या मासिकाच्या जानेवारी 2015 च्या
अंकात सबीरच्या कविता प्रसिद्ध झाल्या. मूळ फारसी भाषेतल्या ह्या कवितांचा
इंग्रजी अनुवाद नसरीन परवाज आणि ह्यूबर्ट मूर ह्यांनी, तर त्यावरून हिंदी भाषेत
अनुवाद गीत चतुर्वेदी ह्यांनी केला आहे. ‘सदानीरा’ ह्या मासिकात ह्या हिंदी
कविता प्रकाशित झाल्या आहेत.