शिक्षण कशासाठी?

मी दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी नाझी फौजांच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधून वाचलेला एक जीव आहे. कुणीही आयुष्यात पाहिल्या नसतील अशा गोष्टी मी याची देही याची डोळा पाहिल्यात : विद्वान अभियंत्यांनी बांधलेली गॅस चेंबर्स, डॉक्टरीचे ज्ञान मिळवलेल्यांनी विष टोचून मारलेली मुले, प्रशिक्षित नर्सने मारून टाकलेली बाळे, शाळा- महाविद्यालयांत शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी गोळ्या झाडून मारून टाकलेल्या स्त्रिया आणि मुले. त्यामुळे शिक्षणाबाबत मी साशंक आहे.

माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमच्या मुलांना माणूस व्हायला मदत करा. तुम्ही घेतलेली मेहनत विद्वान राक्षस, कुशल माथेफिरू किंवा शिकले-सवरलेले आईकमन* तर घडवत नाहीय ना? वाचन, लेखन, अंकगणित ही कौशल्यं आपल्या मुलांना अधिक चांगला माणूस म्हणून घडवत असतील, तर ती शिकण्यात अर्थ आहे.

– होलोकॉस्ट मधून वाचलेल्या एका व्यक्तीने शिक्षकांना लिहिलेल्या पत्रातील उतारा. बालमानसतज्ज्ञ व लेखक डॉ. हेम गिनॉट ह्यांच्या ‘टीचर अँड चाईल्ड’ ह्या पुस्तकात हा उतारा प्रकाशित झालेला आहे

अ‍ॅडॉल्फ आईकमन* – दुसर्‍या महायुद्धादरम्यान जर्मन फौजेत अधिकारी असलेल्या आईकमनची होलोकॉस्टच्या अंमलबजावणीमध्ये प्रमुख भूमिका होती.

Source: https://www.holocaustandhumanity.org/about-us/educational-philosophy/