थरारक सहल
एक दिवस एक मुंगी सहलीला जायला निघाली.
पहिल्यांदा ती एका झाडावर चढली.
तिथे एक सरडा होता. मुंगीला खाण्यासाठी तो तिचा पाठलाग करू लागला.
मुंगीने पाण्यात उडी मारली. तिचे पॅराशूट उघडले आणि ती एका कमळाच्या पानावर उतरली.
शेजारच्याच पानावर एक बेडूक बसला होता. घाबरून मुंगी पॅराशूटच्या खाली दडली.
काही वेळाने ती हळूच बाहेर आली. तिने कमळाच्या पानाचा एक छोटासा तुकडा कापला आणि त्यावर बसून ती किनाऱ्याकडे निघाली.
किनाऱ्यावर पोचताच ती घराकडे धावत सुटली.
सहावीत असताना निरंजन अहिवळे ह्याने लिहिलेली चित्रकथा
कमला निंबकर बालभवन, फलटण